दिवाळीनंतर देशात वायू प्रदूषणाची समस्या बळावली असूगन यामुळे देशातील लहान मुलांच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे. वाढती लोकसंख्या, दिवाळीतील फटाक्यांमुळे होणारे प्रदूषण, खासगी वाहनांची वाढती संख्या यामुळे प्रदूषणाच्या पातळीमध्ये वाढ होत असून लहान मुलांमध्ये फुफ्फुसाचे आजार मोठ्या प्रमाणावर वाढत चालले आहेत. ज्या मुलांना लहानपणापासून अस्थमा सारखे आजार आहेत. अशा मुलांच्या आरोग्यावर वायू प्रदूषणामुळे गंभीर परिणाम होत आहे. यासाठी योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे.
आरोग्यावर विपरित परिणाम
लंग केअर फाऊंडेशनच्या सर्वेक्षणानुसार वाढत्या प्रदूषणामुळे दिल्लीतील ५० टक्क्यांहून अधिक किशोरवयीन मुलांमध्ये छातीची लक्षणे जास्त आहेत, २९ टक्के लोकांना दमा आहे. प्रदूषणामुळे मुलांना मेंदू, फुफ्फुस, हृदय आणि इतर अवयवांच्या समस्या देखील होत आहेत. वायू प्रदूषण कमी करण्यासाठी आणि स्वच्छ हवेसाठी देशातील पहिला स्मॉग टॉवर दिल्ली येथे उभारला गेला होता. पण स्मॉग टॉवर बसवणे ही जनतेच्या पैशाची प्रचंड उधळपट्टी आणि एक गंभीर चूक आहे. हवेला प्रदूषित होण्यापासून रोखण्यातच त्याचे उत्तर आहे. असे, इन्स्टिट्यूट ऑफ चेस्ट सर्जरीचे अध्यक्ष डॉ. अरविंद कुमार यांनी स्पष्ट केले.
(हेही वाचा – व्हॉट्सअप, फेसबुकला मागे टाकत ‘हे’ बनलं जगातील नंबर-१ अॅप!)
अशी घ्या काळजी
अहवालानुसार १५ वर्षांपेक्षा कमी वयाची ९५ टक्के मुले प्रदुषणाच्या विळख्यात दिवसागणिक अडकत चालली आहेत. म्हणून योग्य खबरदारी घेणे आवश्यक आहे. लहान मुलांची विशेषत: नुकताच जन्म झालेल्या मुलांना घराबाहेर घेऊन जाणे टाळावे. बाळाला अवश्य मास्क घालावा, लहान बाळांसाठी बाजारात विशेष मास्क उपलब्ध आहे. यामुळे दूषित हवा रोखली जाईल. छातीच्या विकारांपासून बचाव म्हणून गरम पाण्याचे सेवन करावे. उत्तम आहार घेत रोगप्रतिकारशक्ती वाढवावी.
Join Our WhatsApp Community