केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकार होत असलेल्या संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाचे भूमिपूजन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हर्च्युअल पद्धतीने करण्यात आले. केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकार होत असलेल्या संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाचे भूमिपूजन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हर्च्युअल पद्धतीने करण्यात आले. यावेळी राम कृष्णहरी…म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कार्यक्रमाची मराठमोळी सुरुवात केली. नागरिकांशी संवाद साधताना मोदींनी असे सांगितले की, आज संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम पालखी मार्गाचे केवळ भूमिपूजन होत नाही तर पंढरपूरकडे जाणारा हा मार्ग भागवत धर्माचा पताका आणखी उंचावणार आहे.
पुढे मोदी असेही म्हणाले की, पंढरपूरला आनंदाचं देखील प्रत्यक्ष स्वरुप आहे. आज या मार्गाच्या उद्धाटनाच्या निमित्ताने त्यात सेवेचा आनंदही मिसळला आहे. मला आनंद होत आहे संत ज्ञानेश्वर माऊली आणि तुकोबांच्या पालखी मार्गाचा शुभारंभ होत आहे. वारकऱ्यांना सुविधा मिळणार आहे. पंढरपुराकडे जाणारे हे मार्ग भागवत धर्माची पताका आणखी उंचावेल, यात शंकाच नाही.
Pandharpur signifies happiness and prosperity, and with today's foundation laying, the aspect of service has also been adjoined to it. About 225 km long national highway, which connects to Pandharpur, has also been inaugurated today: PM Modi pic.twitter.com/el7bOAwKTV
— ANI (@ANI) November 8, 2021
वारीत ना जातपात ना भेद
या पालखी मार्गामुळे भगवान विठ्ठलाच्या सेवेसोबत, विकासाला देखील चालना देणारं ठरणार आहे. पंढरपूरला जोडणाऱ्या या महामार्गासाठी प्रयत्न करणाऱ्या सर्वांचे आभार मानूव त्यांनी सर्व वारकऱ्यांना नमन करून कोटी कोटी अभिवादन मोदी यांनी केले. भारतभूमीवर अनेक हल्ले झाले कित्येक संकट आले. मात्र अशा परिस्थितीतही भगवान विठ्ठलावरची श्रद्धा, आस्था आणि वारकऱ्यांची वारी अविरतपणे सुरूच होती. वारीतील दिंडीत कोणतीही जातपात नसते. भेदभाव नसतो. वारकऱ्यांची एकच जात आहे. एकच गोत्रं आहे. ते म्हणजे विठ्ठल आहे. मी जेव्हा सबका साथ, सबका विकास म्हणतो त्याच्यामागे हीच भावना असते. हीच महान परंपरा असते. सर्वांना सोबत घेऊन सर्वांच्या विकासासाठी प्रेरित करते. पंढरपूरची अभिव्यक्ती सर्व काही अलौकीक आहे, असे म्हणत मोदींनी पंढरपूरची वैशिष्ट्ये सांगितली. एकूणच या भव्य महामार्गातून सर्व वारकऱ्यांची सेवा करण्याचा योग आल्याची भावना त्यांनी याप्रसंगी व्यक्त केली.
(हेहीवाचा – आता हेल्पलाईन रोखणार आत्महत्या!)
या कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरसिंगच्या माध्यमातून या कार्यक्रमाला हजेरी लावली. पंढरपूरला जोडणाऱ्या साधारण २२५ किलोमीटर लांबीच्या राष्ट्रीय महामार्गाचे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि इतर मान्यवरांसह वारकऱ्यांच्या उपस्थितीत या भव्य पालखी मार्गाचे अनावरण करण्यात आले.
Join Our WhatsApp Community