राष्ट्रपती भवनात पद्म पुरस्काराचं सोमवारी वितरण करण्यात आलं. २०२० च्या पद्म पुरस्काराने ११९ जणांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सन्मानित केलं. या यादीत ७ पद्मविभूषण, १० पद्मभूषण आणि १०२ पद्मश्री पुरस्कार विजेत्यांचा समावेश आहे. या सोहळ्यात सोळा पुरस्कार मरणोत्तर बहाल करण्यात आले आहेत. या पुरस्कार विजेत्यांच्या यादीत २९ महिला आणि एका तृतीयपंथी व्यक्तीचा समावेश आहे. प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली होती. आज राष्ट्रपती भवनात हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. गेल्या वर्षी २०२० मध्ये कोरोना महामारीमुळे या पुरस्काराचे वितरण करण्यात आले नव्हते. त्यामुळे २०२० आणि २०२१ या दोन्ही वर्षांतील पुरस्कार यावर्षी २०२१ मध्ये देण्यात आले आहेत.
119 Padma Awards to be presented by President Ram Nath Kovind this year, the ceremony for which will begin shortly.
The list comprises 7 Padma Vibhushan, 10 Padma Bhushan and 102 Padma Shri Awards. 29 of the awardees are women, 16 Posthumous awardees and 1 transgender awardee. pic.twitter.com/OlyRT9q4Zz
— ANI (@ANI) November 8, 2021
यामध्ये महाराष्ट्रातील एकूण सहा जणांचा समावेश आहे. सिंधुताई सपकाळ आणि गिरीश प्रभुणे यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. सामाजिक कार्याबद्दल त्यांना हा पुरस्कार दिला गेला आहे. नामदेव कांबळे यांना साहित्याबद्दल, कला क्षेत्रातील परशुराम गंगावणे आणि उद्योग श्रेत्रासाठी रजनीकांत श्रॉफ यांना पद्म पुरस्कार जाहीर झाले आहेत.
सिंधुताई सपकाळ आणि गिरीश प्रभुणे यांना सामाजिक कार्याबद्दल, परशुराम गंगावणे यांना कला क्षेत्रातील योगदानाबद्दल, नामदेव कांबळे यांना साहित्यातील योगदानाबद्दल आणि जसवंतीबेन पोपट यांना उद्योग क्षेत्रातील योगदानाबद्दल पद्मश्री पुरस्कार घोषित करण्यात आला आहे. तर महाराष्ट्रातील उद्योजक रजनीकांत श्रॉफ यांचा पद्मभूषण पुरस्काराने गौरव करण्यात येणार आहे.
पद्मभूषण (२०२१)
- रजनीकांत देवीदास श्रॉफ (उद्योजक)
पद्मश्री (२०२१)
- परशुराम आत्मराम गंगावणे (कला)
- नामदेव कांबळे (साहित्य)
- जसवंतीबेन जमनादास पोपट (उद्योग क्षेत्र)
- गिरीश प्रभुणे (सामाजिक कार्य)
- सिंधुताई सपकाळ (सामाजिक कार्य)
- पोपटराव भागुजी पवार (सामाजिक कार्य)
पद्मश्री (२०२०)
- झहीर खान (क्रिडा)
- रमन गंगाखेडकर (विज्ञान व तंत्रज्ञान)
- पोपटराव भागुजी पवार (सामाजिक कार्य)
- करण जोहर (कला)
- सरिता जोशी (कला)
- एकता कपूर (कला)
- राहिबाई पोपेरे (इतर)
- कंगना रणावत (कला)
- अदनान सामी (कला)
- सय्यद मेहबूब कदरी (सामाजिक कार्य)
- संद्रा डिसूझा (वैद्यकीय क्षेत्र)
- सुरेश वाडकर (कला)
पद्म भुषण (२०२०)
- आनंद महेंद्रा (उद्योग क्षेत्र)