‘डुकराशी कुस्ती खेळू नये’, मलिकांच्या बॉम्बनंतर फडणवीसांचं खोचक ट्विट

141

गुन्हेगारांशी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे संबंध असून त्यांच्याच आशीर्वादाने राज्यात बनावट नोटांचा खेळ सुरू असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी केला आहे. मलिक यांच्या या आरोपानंतर देवेंद्र फडणवीस यांनी लगेचचं खोचक ट्विट करून त्यांच्यावर पुन्हा निशाणा साधला आहे. डुकराशी कुस्ती कधीच खेळू नये, हे मी आधीच शिकलो आहे, असा हल्लाबोल फडणवीस यांनी मलिकांवर केला आहे. मलिकांनी केलेल्या आरोपावर फडणवीस यांनी त्यावर प्रत्यारोप करत त्यावर ट्विट शेअर करत प्रत्युत्तर देखील दिले आहे. सध्या सोशल मीडियावर हे ट्विट चांगलाच चर्चेचा विषय ठरत आहे.

असे आहे ट्विट

देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करून एका सुविचाराचा आधार घेतला आहे. कोणत्याही डुकराशी कधीच कुस्ती खेळू नये हे मी आधीच शिकलो आहे. त्यामुळे तुम्हीही घाणीने माखून जाता आणि डुकरालाही खाणीत लोळणं जास्त आवडत असतं, असा टोला फडणवीस यांनी मलिकांना उद्देशून लगावला आहे.

”कोणत्याही डुकराशी कधीच कुस्ती खेळू नये हे मी आधीच शिकलो आहे. त्यामुळे तुम्हीही घाणीने माखून जाता आणि डुकरालाही तेच आवडत असतं…”

असा केला मलिकांनी आरोप

देशभरात ८ नोव्हेंबर २०१६ रोजी नोटाबंदी घोषणा करण्यात आली. भाजपा आणि शिवसेनेची युती असताना पंतप्रधान मोदी यांनी देशातील काळा पैसा आणि बनावट नोटांचा साठा नष्ट करण्यासाठी नोटाबंदीचा निर्णय घेतला होता. नोटाबंदीच्या निर्णयानंतर देशभरातील विविध ठिकाणी बनावट नोटा सापडत होत्या. मात्र, महाराष्ट्रात संपूर्ण वर्षभर एकदाही बनावट नोटा सापडल्या नाहीत. कारण, या सगळ्या रॅकेटला देवेंद्र फडणवीस यांचा आशीर्वाद होता, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी म्हटले. दरम्यान, बुधवारी पत्रकार परिषदेत घेत मलिकांनी फडणवीसांवर गंभीर आरोप देखील केला आहे.

(हेही वाचा- आता मलिकांच्या निशाण्यावर शिवसेना?)

यावेळी ते असे म्हणाले की, नोटाबंदी करण्यात आली त्यानंतर महाराष्ट्रात तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आशीवार्दाने बनावट नोटांचे रॅकेट सुरु होते. नोटाबंदीचा निर्णय ज्यावेळी घेण्यात आला तेव्हा शिवसेना आणि भाजपाची सत्ता होती. त्यामुळे नवाब मलिकांच्या निशाण्यावर शिवसेना देखील येणार का असा सवाल आता उपस्थितीत केला जातोय. विशेष म्हणजे ज्या महाविकास आघाडी सरकारच्या सत्तेत नवाब मलिक हे देखील एक मंत्री असल्याने पुन्हा एकदा चर्चेला उधाण आले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.