मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना गेले काही दिवस पाठीचं आणि मान दुखीचा त्रास होत आहे. हा त्रास अधिक बळावू नये यासाठी एचएन रिलायन्स रुग्णालयात गुरुवारी शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. त्यांच्या अनुपस्थितीत मुख्यमंत्रीपदाचा कारभार एकनाथ शिंदे सांभाळणार असल्याच्या चर्चा सोशल मिडीयावर होत होत्या. त्यामुळे आता एकनाथ शिंदे यांनी यावर स्पष्टीकरण दिले आहे. या सगळ्या अफवा असून, यात अजिबात तथ्य नसल्याचं शिंदे यांनी सांगितले आहे.
Join Our WhatsApp Communityमुख्यमंत्रीपदाचा तात्पुरता कार्यभार नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सोपविण्यात आल्याचे वृत्त सोशल मीडियावरून व्हायरल होत असून त्यात कुठलेही तथ्य नाही. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब यांच्यावर उद्या एक छोटीशी शस्त्रक्रिया करण्यात येणार असून, त्यानंतर अवघे तीन ते चार दिवस आराम केल्यानंतर ते पुन्हा जनतेच्या सेवेत रुजू होतील. आई जगदंबेचा कृपाशीर्वाद आणि तमाम जनतेच्या सदिच्छा उद्धव ठाकरे साहेबांसोबत आहेत. त्यामुळे समाजमाध्यमावर फिरणाऱ्या खोट्या आणि खोडसाळ मेसेजस आणि पोस्टवर विश्वास ठेवू नये.
एकनाथ शिंदे, मंत्री शिवसेना