‘एसटी’चा संप मोडून काढण्यासाठी शिवसेनेचा ‘बेस्ट’ मार्ग

संप चिरडून टाकण्याचा सेनेकडून प्रयत्न

110

राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी स्वयं पुर्तीने पुकारलेल्या संपामुळे सरकारमधील सत्ताधारी शिवसेनेची त्रेधातिरपीट उडाली आहे. मुंबई महानगरात एसटीची सेवा देण्यासाठी त्यांनी बेस्ट मार्ग निवडला आहे. एसटी कर्मचाऱ्यांचा हा संप मोडित काढण्यासाठी सरकारने आणि पर्यायाने शिवसेनेने सत्तेचा वापर करत बेस्टच्या गाड्या रस्त्यावर उतरवरून त्यांच्या बस चालकांनाही कामाला जुंपले आहे.

संप चिरडून टाकण्याचा सेनेकडून प्रयत्न

मुंबईसह पनवेल मार्गावर एसटी बसची जागा बेस्टने घेतली असून एसटी बस थांबा मार्गावर बेस्ट बस थांबवून प्रवाशांना सेवा देत आहे. त्यामुळे बेस्टची मदत घेऊन एसटी कामगारांचा संप चिरडून टाकण्याचा प्रयत्न सेनेकडून सुरू आहे. एसटी महामंडळाचे विलीनीकरण सरकारमध्ये करून घेण्याच्या मागणी बाबत कामगार संघटनानांचे नेतृत्व झुगारून कामगारांनी स्वयं पुर्तीने आंदोलन पुकारले आहे. या मागणीसाठी राज्यभरातील बस आगार आणि कार्यशाळा आदी ठिकाणी कर्मचाऱ्यांनी आंदोलन पुकारले आहे. हा बेमुदत संप मोडून काढण्यासाठी आता सरकारने आपली सत्ता असलेल्या बेस्ट उपक्रमाचा वापर करण्यास सुरुवात केली आहे.

(हेही वाचा – संप मागे घ्या! ‘लालपरी’ आर्थिक संकटात आहे; ‘एसटी’कडून भावनिक आवाहन)

एसटी थांब्यावरच थांबून प्रवाशांना सेवा

हे आंदोलन मोडून काढण्यासाठी शिवसेनेकडून आता बेस्टच्या गाड्या रस्त्यावर उतरवल्या असून शुक्रवारी वरळी डेपोतील गाड्या दादर- पनवेल या एसटी मार्गावर चालवण्यात आल्या आहेत. या डेपोचा कर्मचारी वर्ग या मार्गावरील बस सेवेसाठी वापरण्यात आला होता. याशिवाय प्रतीक्षा नगर, वडाळा या विभागाच्या बसही एसटी मार्गावर सुरू करण्यात आल्या आहेत. या बसेस केवळ एसटी थांब्यावरच थांबून प्रवाशांना सेवा देत आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.