एनसीबी ड्रग्स प्रकरणात मुख्य पंच असलेला किरण गोसावीवर आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कलम ४२० आणि ४०६ अंतर्गत पुण्यातील भोसरी पोलिस ठाण्यात किरण गोसावीवर एफआयआर दाखल करण्यात आला आहे. गोसावी याच्यावर नोकरीच्या आमिषाने फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
नोकरीच्या नावाने फसवणूक
परदेशात हॉटेल मॅनेजमेंटची नोकरी लावतो असे म्हणून भोसरी परिसरातील विजयकुमार सिद्धलिंग कानडे या तरुणाची २ लाख २५ हजारांची फसवणूक करण्यात आली आहे. या प्रकरणी भोसरी पोलिसात त्यांनी फिर्याद दिली असून आरोपी किरण गोसावीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विजयकुमार कानडे यांनी २०१५ ला नोकरीसाठी ऑनलाइन अर्ज केला होता. विजयकुमार यांच्याकडून वेळोवेळी आणि ऑनलाइन पद्धतीने एकूण २ लाख २५ हजारांची फसवणूक केली असल्याचं फिर्यादीत म्हटले आहे. घटनेचा अधिक तपास भोसरी पोलीस करत आहेत.
( हेही वाचा : कोरोनाबाबत गाफील राहू नका! ब्रिटन-फ्रान्सची ‘ही’ झाली अवस्था…)
अडचणींमध्ये वाढ
तक्रारदार विजयकुमारच्या म्हणण्यानुसार किरण गोसावीने त्यांची २ लाख रुपयांची फसवणूक केली आणि नोकरीही दिली नाही. या प्रकरणी लवकरच पिंपरी पोलिस गोसावीला ताब्यात घेऊन चौकशी करणार आहेत. त्यामुळे, मुंबई क्रूझ ड्रग्स प्रकरणातील मुख्य साक्षीदार किरण गोसावीच्या अडचणींमध्ये वाढ होणार आहे.
Join Our WhatsApp Community