मराठीतील हौशी – प्रायोगिक रंगभूमीची नाट्यपंढरी असलेल्या आणि 127 वर्षांची अखंडित कारकीर्द असलेल्या भरत नाट्य संशोधन मंदिरातर्फे 150 वर्षांतील मराठी रंगभूमीचा माहितीपूर्ण, रंजक इतिहास स्वरनाट्य रसगंगा या नावाने पुस्तकरुपात येत आहे. पुस्तकाचे प्रकाशन शनिवार, 13 नोव्हेंबर रोजी होणार आहे. विधान परिषदेच्या उपसभापती डॅाक्टर नीलम गो-हे यांच्या हस्ते संध्याकाळी 5 वाजता भरत नाट्य संशोधन मंदिरात या पुस्तकाचे प्रकाशन होणार असल्याची माहिती मंदिराचे कार्याध्यक्ष अजय जबडे यांनी निवेदनाद्वारे दिली आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जेष्ठ अभिनेते शरद पोंक्षे, पुस्तकाच्या लेखिका अर्चना साने, यशश्री पुणेकर तसेच पुस्तकाचे संपादक गोपाळ अवटी आदी उपस्थित राहणार आहेत.
नाट्यगीतांचा कार्यक्रम रसिकांसाठी विनामूल्य
पुस्तकाच्या प्रकाशनाच्या कार्यक्रमानंतर युवा पिढीतील 15 गायक- गायिका स्वरनाट्य रसगंगा हा नाट्यगीतांचा कार्यक्रम सादर करणार आहेत.चारुदत्त आफळे यांचाही या कार्यक्रमात विशेष सहभाग असणार आहे. 150 वर्षातील लोकप्रिय नाट्यगीते या निमित्ताने रसिकांना ऐकायला मिळतील. भरत नाट्य संशोधन मंदिराच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त मराठी रंगभूमीचा माहितीपूर्ण इतिहास पुस्तक रुपात प्रसिद्ध करण्याचा संकल्प होता. पुस्तक प्रकाशनानंतर होणारा नाट्यगीतांचा कार्यक्रम रसिकांसाठी विनामूल्य असणार आहे.
( हेही वाचा : ‘कोव्हिडवर’ मात करण्यासाठी ‘कोव्हॅक्सिन’ प्रभावी )
पुस्तकात दुर्मीळ प्रकाशचित्रांचा समावेश
पुस्तकात समाविष्ट करण्यात आलेल्या दुर्मिळ प्रकाशचित्रांमुळे मराठी रंगभूमीचा इतिहास जीवंत झाला असून, हे पुस्तक रंजक झाले आहे. या पुस्तकाची प्रस्तावना जेष्ठ अभिनेते आणि भरत नाट्य मंदिराचे विश्वस्त रविंद्र खरे यांनी लिहिली आहे. नाट्य मंदिरातील उपलब्ध जागांप्रमाणे प्रवेश दिला जाणार असल्याचे संस्थेतर्फे कळविँण्यात आले आहे.
Join Our WhatsApp Community