तुमच्या सोसायटीच्या आवारात एखाद्या अडगळीच्या ठिकाणी खूप दिवसांनी लक्ष गेल्यानंतर एखादा कुत्रा किंवा मांजर दिसून येते. असेच खूप दिवस ती जागा स्वच्छ झाली नाही आणि इमारतीतील काही वस्तू पडलेल्या भागांतून अचानक सापाचं दर्शन झालं तर? त्यातही खराब झालेल्या पांडा या प्राण्याचं टेडी बिअर पाहत त्या खाली तुम्हांला साप दिसला तर?
जंगल परिसरानजीक रहिवाशी संकुल असल्यास सजग राहणे गरजेचे आहे. त्यासाठी आवश्यक सूचनांचे पालन करावे. परिसराची स्वच्छताही राखावी.
– पवन शर्मा, संस्थापक, रेसकिंग असोसिएशन फॉर वाइल्डलाइफ वेल्फेअर
एका टोपलीत सापाने घर बनवले
हा अनुभव नुकताच मुलुंड पश्चिम येथील रहिवाशांनी घेतला. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाला लागून असलेल्या या परिसरात सरपटणा-या प्राण्यांचा वावर अधूनमधून दिसून येतो. मात्र अडगळीच्या ठिकाणी एका टोपलीवर पांड्याच्या जुनाट टेडी बिअरखालीच रॅट स्नॅक या सापाने आपले घर बनवले होते. त्यामुळे रहिवाशांनाही हा साप पटकन दिसून आला नाही. एका रहिवाशाला सापांच दर्शन झाले आणि संपूर्ण इमारतीतील सापाची गोष्ट पसरली. रहिवाशांनी लगेचच रेसकिंग असोसिएशन फॉर वाइल्डलाइफ वेल्फेअर (रॉ) या प्राणीप्रेमी संस्थेला मदतीला बोलावले. पाच फुटांचा हा साप बिनविषारी असल्याने धोका टळला. साप व्यवस्थित असल्याने त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.
(हेही वाचा : संजय राऊत म्हणतात, शरद पवार, उद्धव ठाकरे एकच!)
Join Our WhatsApp Community