पन्नास लाख इनामी नक्षलवाद्यांचा सर्वात मोठा नेता ठार!

172

शनिवारी झालेल्या नक्षलवादी चकमकीत देशातील CPI (Maoist) सर्वात टॉपचा नक्षल कमांडर आणि ५० लाखाचं बक्षिस असलेला सेंट्रल कमिटीचे मिलिंद तेलतुंबडे या ठार झाला आहे. या चकमकीत ठार झालेल्या नक्षलवाद्यांची नावे पोलिसांनी प्रसिद्ध केली आहेत. त्या यादीमध्ये तेलतुंबडे यांचं नाव देखील असल्याचं समोर आले आहे. या नक्षल चकमकीत गडचिरोली पोलिसांनी तब्बल २६ नक्षल्यांना कंठस्नान घातल्यानंतर त्या भागात सर्चिंग ऑपरेशन दरम्यान २९ अत्याधुनिक शत्रसाठा आणि मोठ्या प्रमाणात नक्षल साहित्य, २६ नक्षल्यांचे शव रात्री उशिरा कोटकल पोलीस मदत केंद्रात पोहोचविण्यात आल्याची देखील माहिती मिळतेय.

नक्षलवाद्यांची संख्या वाढवण्याची शक्यता

गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यातील कोटगूल-ग्यारापत्तीच्या घनदाट जंगलात झालेल्या चकमकीत २६ माओवादी ठार झाल्याची माहिती गडचिरोली पोलिसांनी दिली आहे. त्यापैकी माओवादी चळवळीतले महत्त्वाचे नेते मिलिंद तेलतुंबडे हा देखील एक आहेत. या चकमकीत मारल्या गेलेल्या नक्षलवाद्यांची संख्या वाढवण्याची शक्यता असून या चकमकीनंतर घटनास्थळी शोध मोहीम सकाळपासून राबवणं सुरू करण्यात आली आहे.

(हेही वाचा – पोलिसांची मोठी कारवाई! गडचिरोलीत 26 नक्षलवाद्यांचा खात्मा)

मिळालेल्या माहितीनुसार, माओवाद्यांशी झालेल्या चकमकीत गडचिरोली पोलीस दलाच्या C-60 चे चार जवान जखमी झाले आहेत. चारही जवानांना उपचारासाठी हेलिकॉप्टरद्वारे नागपूर येथे हलविण्यात आलं आहे. रविंद्र नैताम (वय ४२), सर्वेश्वर आत्राम (वय ३४), महरु कुळमेथे (वय ३४) आणि टीकाराम कटांगे (वय ४१) अशी जखमी जवानांची नावे आहेत. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

कोण आहे मिलिंद तेलतुंबडे?

मिलिंद तेलतुंबडे हा पन्नास लाख रुपयांचा इनाम असलेला नक्षलवाद्यांचा सर्वात मोठा नेता आहे. यवतमाळ जिल्ह्यातील राजूर गावाचा रहिवासी असलेला मिलिंद तेलतुंबडे भीमा कोरेगाव प्रकरणात अटक करण्यात आलेले प्राध्यापक आनंद तेलतुंबडे यांचा भाऊ आहे. त्याच्यावर देखील या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एलगर परिषदेतील फरार आरोपी, मावोवादी सर्वोच्च सेंट्रल कमिटीचा सदस्य आणि एमएमसी म्हणजे महाराष्ट्र, छत्तीसगड व मध्य प्रदेश तिन्ही राज्यांचा एमएमसी असा गुरीला झोन मिलिंद तेलतुंबडे याने विकसित केला आहे.

मिलिंद तेलतुंबडे हा वणी – राजुरा परिसरात लहानाचा मोठा झाला असून शहरी भागात मावोवादी संघटनांमध्ये दलित समाजातील तरुणांना भरती करून घेण्याचे त्याचे विशेष लक्ष होते. शस्त्र ट्रेनिंग देणे, ऑपरेशनला मान्यता देणे हे सुद्धा त्याच्या कामाचा भाग होता.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.