रोज काहीतरी विक्षिप्त वा आगळ्या -वेगळ्या घटना आपल्या अवतीभोवती घडत असतात. मागेच एकाने खेकडा चावल्याची तक्रार पोलिसांकडे करत, त्या खेकड्याला तुम्ही अटक करा अशी मागणी केली होती. आता, तर एका पठ्याने आपली म्हैस दूध देत नाही, म्हणून म्हैस घेऊन थेट पोलीस स्टेशन गाठलं आहे. मध्य प्रदेशातील भिंड जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने काही दिवसांपासून माझी म्हैस दूध देत नाही, मला मदत करा, अशी तक्रार केली. यानंतर, पोलिसांनी पशुवैद्यकीय डॉक्टरांशी संपर्क साधून, त्या शेतकऱ्याला म्हशीचे दूध काढण्यास मदत केली.
पहा व्हिडिओ
पोलिसांनी केली मदत
पोलीस उपाधीक्षक अरविंद शाह यांनी सांगितले की, बाबुलाल जाटव (४५) नावाच्या एका व्यक्तीने शनिवारी नायगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. यात, गेल्या काही दिवसांपासून त्यांची म्हैस दूध देत नाही, असे सांगण्यात आले होते. यानंतर, सुमारे चार तासांनंतर तो थेट आपल्या म्हशीला घेऊनच पोलीस ठाण्यात आला आणि त्याने म्हशीचे दूध काढण्यासाठी पोलिसांची मदत मागितली. यानंतर, पोलिसांनी पशुवैद्यकीय विभागाशी संपर्क साधून, शेतकऱ्याला काही टिप्स सांगितल्या. यानंतर, संबंधित शेतकऱ्याने दूध काढण्याचा प्रयत्न केला असता, म्हशीने दूध काढू दिले. यानंतर पोलिसांचे आभार मानण्यासाठी तो शेतकरी पुन्हा सकाळच्या सुमारास पोलीस ठाण्यात आला होता.
(हेही वाचा: ‘शिवचरित्राचा महान उपासक गमावला’)