कोटींच्या घड्याळांवर दिलखुलास उत्तर! काय म्हणाला हार्दिक पंड्या?

163

दुबई येथे टी-२० विश्वचषक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. भारतीय संघ मायदेशी परतल्यानंतर, विमानतळावर सीमाशुल्क विभागाने क्रिकेटपटू हार्दिक पंड्याची ५ कोटी किंमतीची २ घड्याळे ताब्यात घेतली. या घड्याळांची कोणतीही माहिती व पावती नसल्यामुळे ही दोन्ही घड्याळे ताब्यात घेतली गेली. तसेच हार्दिक याने या घड्याळांचा कस्टम वस्तूंमध्ये समावेश देखील केला नव्हता. यामुळे सोशल मिडियावर एकच खळबळ माजली. यावर खेडाळूने ट्विटरवर पत्र लिहित स्पष्टीकरण दिले आहे.

काय म्हणाला हार्दिक पंड्या?

१५ नोव्हेंबर, सोमवारी सकाळी दुबईहून आल्यावर, मी माझे सामान घेतले आणि मी आपोआप मुंबई विमानतळावरील कस्टम काउंटरवर माझ्या खरेदी केलेल्या सामानाची माहिती देण्यासाठी आणि आवश्यक सीमाशुल्क भरण्यासाठी गेलो. मुंबई विमानतळावरील माझ्या माहितीबाबत सोशल मीडियावर चुकीची प्रतिमा मांडली जात असून, जे काही घडले ते मला स्पष्ट करायचे आहे. दुबईतून मी कायदेशीर मार्गाने खरेदी केलेल्या मालाची स्वतः माहिती दिली आणि जे काही शुल्क असेल ते भरण्यास मी तयार आहे.

( हेही वाचा : मुंबईकरांना धक्का! मेट्रो कारशेड रखडणार! काय म्हणाले उच्च न्यायालय? )

दरम्यान, कस्टम विभागाने खरेदीशी संबंधित सर्व कागदपत्रे मागितली आणि ती मी दिली. तथापि, सीमा शुल्क वस्तूंचे मूल्यांकन करत आहे आणि मी आधीच सांगितले आहे की, त्यावर जो काही कर असेल तो भरला जाईल. सोशल मीडियावरील अफवांनुसार घड्याळांची किंमत ५ कोटी नाही तर दीड कोटी रुपये आहे. मी देशाचे कायदे पाळणारा नागरिक आहे आणि मी सर्व सरकारी संस्थांचा आदर करतो. मला मुंबई सीमाशुल्क विभागाकडून पूर्ण सहकार्य मिळाले आणि मी माझ्या पूर्ण सहकार्याची ग्वाही दिली आहे आणि या प्रकरणी त्यांना आवश्यक असलेली वैध कागदपत्रे उपलब्ध करून देईन. माझ्यावर कायदेशीर मर्यादा ओलांडण्याचे जे आरोप केले जात आहेत ते सर्व निराधार आहेत. असे हार्दिक पंड्याने स्पष्ट केले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.