प्लास्टिक बाळगल्यास आता तुम्हाला भरावा लागणार ‘इतका’ दंड

157

सार्वजनिक ठिकाणी कचरा केल्यास, थर्माकॅाल बाळगल्यास, तसेच प्लास्टिक वापरल्यास कडक कारवाई करणार असल्याचा इशारा वसई- विरार पालिकेने केला आहे. या नियमांचे उल्लंघन केल्यास  5 ते 25 हजारापर्यंतचा दंड आकरला जाणार आहे. स्वच्छता अभियानाअंतर्गत हा निर्णय पालिकेने घेतला आहे.

अविघटनशील वस्तू वापरण्यास बंदी

वसई-विरार पालिका हद्दीत दुकानदारांकडून, मोठ्या प्रमाणात प्लास्टिक पिशव्या असतात. त्यामुळे 75 मायक्रोनपेक्षा कमी असलेल्या, एकदाच वापर होणा-या प्लॅस्टिक पिशव्या , भांडी व थर्माकोल यांसारख्या अविघटनशील वस्तू वापरण्यास बंदी घालण्यात आली आहे. या वस्तूंचा वापर आढळल्यास तसेच, सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता केल्यास प्रथम वेळी 5 हजार दंड, तर नंतर 10 आणि 25 हजार रुपये इतका दंड आकारण्यात येणार आहे.

असा आकारणार दंड 

प्लास्टिक पिशव्या वापरण्यास मनाई करण्यात आली असून, घनकचरा व्यवस्थापन विभागाने पत्रक काढले आहे. तर सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकताना नागरिक आढळले तर 100 ते 200 इतका तर, सार्वजनिक ठिकाणी मलमूत्र विसर्जन केल्यावर 200 रुपये दंड आकारला जाणार आहे.

(हेही वाचा : पेंग्विनची स्कॉटलंड वारी, शेतकरी उपाशीपोटी काम करी! नितेश राणेंचा हल्लाबोल )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.