या सरकारचे हिवाळी अधिवेशन घेण्याची अजिबात तयारी नाही. त्यांची तशी धमक नाही. या सरकारचा मुख्यमंत्री आजारी आहे आणि सरकारही आजारी आहे, अशा शब्दांत भाजपाचे नेते, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी हल्लाबोल केला. सध्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर शस्त्रक्रीया झाली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. याचा संदर्भ घेत राणे यांनी ही जहरी टीका केली.
मंगळवारी सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन बैठकीनंतर मंत्री राणे यांनी माध्यमांशी बोलतांना त्यांनी ठाकरे सरकारवर टीका केली. सरकारकडून जिल्ह्यासाठी आवश्यक निधी दिला जात नाही, जेवढी निधी दिला जातो, तो पुन्हा परत केला जात आहे, असेही मंत्री राणे म्हणाले. या बैठकीत राणे यांनी जिल्हा प्रशासनाला विरोध केला. तसेच निधी वाटपावरून आक्षेप नोंदवले. जिल्ह्याचा विकासा फंड हा दिवसे न् दिवस कमी होत आहे. या वर्षी नोव्हेंबर महिन्यात फक्त 9 टक्के खर्च झाला आहे. यावरून या सरकारची ग्रामीण विकासाची भूमिका काय हे स्पष्ट होते. सिंधुदुर्गाला तर ज्या प्रकारे वागणूक दिली जाते ती अत्यंत वाईट आहे. जिल्ह्यात वादळ आले, अतिवृष्टी झाली तरी दखल घेतली जात नाही. पुरेसे पैसे दिले जात नाहीत. आता कुठे निधीचे वाटप होणार आहे. जिल्हा नियोजनाची बैठक ही निव्वळ औपचारिकता आहे. जानेवारीनंतर बैठक होत आहे. विकासाला चालना मिळेल असे बजेट या नियोजन समितीकडे नाही. आधी पैसे जाहीर करायचे आणि नंतर मागून घ्यायचे असे या सरकारचे धोरण आहे. जिल्हा परिषदेसाठी सरकारने 46 कोटी रुपये दिले होते. मात्र, विभागीय चौकशीची धमकी देऊन जिल्हाधिकाऱ्याकडून तो निधी परत मागवून घेतला, असा गंभीर आरोप राणेंनी केला.
भाजपावर दंगली घडवल्याचा आरोप चुकीचा
राज्यात दंगली होण्यामागे भाजपाला कारणीभूत ठरवले जात आहे, हे चुकीचे आहे. कोण दंगली घडवून आणत आहे, हे सर्वांना माहीत आहे, भाजपावर आरोप करणे चुकीचे आहे, असेही मंत्री राणे म्हणाले.
Join Our WhatsApp Community