देशात ‘चाइल्ड पोर्नोग्राफी’चे जाळे, महाराष्ट्रासह १४ राज्यांत सीबीआयचे छापे

130

लहान मुलांचे अश्लील व्हिडिओ बनवून शेअर केल्याप्रकरणी सीबीआय आज (मंगळवार) सकाळपासून देशातील 14 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील 76 ठिकाणी छापे टाकत आहे. याप्रकरणी 14 नोव्हेंबर रोजी 83 आरोपींविरुद्ध 23 नामांकित एफआयआर नोंदवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. दिवसेंदिवस चाईल्ड पोर्नोग्राफी वाढताना दिसत असून यासंदर्भात आता सीबीआयने कठोर पावलं उचलली आहे.

या 14 राज्यांत सीबीआयचे छापे

आज दिवसाच्या सुरूवातीलाच मध्य प्रदेश, छत्तीसगड, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, दिल्ली, उत्तर प्रदेश, पंजाब, बिहार, ओडिसा, तामिळनाडू, राजस्थान, गुजरात, हरियाणा, हिमाचल प्रदेशमध्ये विविध ठिकाणी अनेक लोकांच्या घरांवर छापे टाकण्यात आले. तर मध्य प्रदेशातील 3 मोठ्या शहरांमध्ये देखील सीबीआयकडून हे छापे टाकण्यात येत आहेत.

(हेही वाचा – मुंबईत फिरताय? सावधान! सायको किलर्सचा वाढतोय धोका)

महाराष्ट्र दुसऱ्यास्थानी…

देशभरातील मुलांविरुद्ध सायबर गुन्ह्यांमध्ये 400 टक्क्यांपेक्षा जास्त वाढ झाली असल्याची आकडेवारी नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोने नुकतेच जारी केली आहे. तर 2020 वर्षाच्या NCRB च्या माहितीनुसार, सायबर पोर्नोग्राफीची सर्वाधिक प्रकरणे उत्तर प्रदेशात 161, तर महाराष्ट्रात 123 प्रकरणं असल्याने महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी आहे, यासह कर्नाटक 122 आणि केरळमध्ये 101 नोंदली गेली आहेत. याशिवाय ओडिशामध्ये 71, तामिळनाडूमध्ये 28, आसाममध्ये 21, मध्य प्रदेशात 20, हिमाचल प्रदेशमध्ये 17, हरियाणामध्ये 16, आंध्र प्रदेशमध्ये 15, पंजाबमध्ये 8, राजस्थानमध्ये 6 प्रकरणे नोंदवली गेली आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.