महाराष्ट्र भूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे हे सोमवारी अनंतात विलीन झाले. त्यांना अखेरची आदरांजली वाहण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे बाबासाहेबांच्या निवासस्थानी गेले होते. आता राज ठाकरेंनी एक व्यंगचित्र आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केलं आहे. शिवाज्ञा ..असा मथळा देतं राज ठाकरेंनी बाबासाहेबांना अनोखी मानवंदना दिली आहे. राज ठाकरे यांनी शेअर केलेल्या व्यंगचित्रात छत्रपती शिवाजी महाराज आणि बाबासाहेब पुरंदरे यांच्यातील संभाषण दाखवण्यात आलं आहे. सध्या हे व्यंगचित्र सोशल मिडियाद्वारे मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
असे आहे व्यंगचित्र
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी आपले संपूर्ण आयुष्य छत्रपती शिवाजी महाराजांची नाटकं लिहिली, पोवाडे लिहिले, व्याख्याने दिली, संशोधन केलं, त्यासाठी बाबासाहेब इतिहासाच्या शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंनी संपूर्ण आयुष्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनपटावर नाटक, पोवाडे, ग्रंथ लिहून व्याख्याने दिली. त्यांनी महाराजांची इत्यंभूत माहिती मिळवली. त्यांच्या या कार्याला सलाम करणार व्यंगचित्र राज ठाकरेंनी शेअर केलं आहे.
#शिवशाहीर #बाबासाहेब_पुरंदरे #छत्रपतीशिवाजीमहाराज pic.twitter.com/RbyhyNcvu0
— Raj Thackeray (@RajThackeray) November 16, 2021
शिवाज्ञा या मथळ्याखाली राज ठाकरेंनी शेअर केलेल्या या व्यंगचित्रात छत्रपती शिवाजी महाराज बाबासाहेबांशी संभाषण करत असल्याचं दाखवण्यात आलं आहे. ये रे माझ्या गड्या, मला शोधण्यासाठी जगभर खूप पायपीट केलीस, अविश्रांत मेहनत घेतलीस, माझ्यासाठी संपूर्ण आयुष्य खर्ची घातलस ये, आता जरा आराम कर. अशा आशयाचं ते व्यंगचित्र आहे.
(हेही वाचा :कांदिवलीतील गोपीनाथ मुंडे उद्यान आता कात टाकणार )
Join Our WhatsApp Community