दिल्ली उच्च न्यायालयाने मंगळवारी राष्ट्रीय राजधानीतील रेस्टॉरंट आणि बारमध्ये काही काळासाठी ‘हर्बल हुक्का’ वापरण्यास परवानगी दिली आहे. ‘हर्बल हुक्का’ सेंद्रिय औषधी वनस्पतींपासून बनवलेले असते आणि त्यात तंबाखू नसते, असेही सांगितले जात आहे. या प्रकरणात, न्यायालयाने दिल्ली सरकारला याचिकांवर आपली भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले आहे. यावेळी न्यायालयाने म्हटले की, कोविड प्रतिबंध हे कायमचे राहू शकत नाहीत. अनेक रेस्टॉरंट्स आणि बार मालकांनी हर्बल फ्लेवर्ड हुक्क्याच्या विक्री आणि सेवेवरच्या बंदीच्या विरोधात याचिका दाखल करण्यात आल्या होत्या, त्या याचिकांवर सुनावणी झाली आहे.
(हेही वाचा – ‘जंक फूड’ने लहान मुलांच्या दातांचे आरोग्य धोक्यात)
कोविड -19 च्या कारणास्तव लादलेले प्रतिबंध कायमचे चालू शकत नसल्याचे न्यायमूर्ती रेखा पल्ली यांनी सांगितले. त्यांनी असेही सांगितले की, यापूर्वीच सिनेमा हॉल आणि स्विमिंग पूलला पूर्ण क्षमतेने काम करण्याची परवानगी दिली आहे. अंतरिम दिलासा म्हणून परवानगी देत आहे. त्यामुळे बार आणि रेस्टॉरंट्स आश्वासन देतील की सर्व कोरोना व्हायरस प्रोटोकॉलचे पालन करून केवळ हर्बल हुक्का विक्री केली जाईल.
म्हणून हर्बल हुक्का वापरावर होती बंदी
हर्बल हुक्का वापरण्यासाठी कोणत्याही परवान्याची आवश्यकता नसते, कारण त्यात तंबाखूचा वापर नसतो, या संदर्भातील याचिका दिल्ली उच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या होत्या. परंतु, तरी देखील पोलिसांकडून छापे टाकून जप्ती करण्यात येत होती. दरम्यान, कोरोनाचा प्रादुर्भाव असताना दिल्ली सरकारचं असं म्हणणं होतं की, सार्वजनिक ठिकाणी हुक्का वापरल्यास कोरोनाचा प्रसार अधिक होऊ शकतो, म्हणून हा निर्णय घेण्यात आला होता.
Join Our WhatsApp Community