अनुसूचित जाती व जमाती मधील विद्यार्थी शासकीय लाभापासून वंचित राहू नयेत, यासाठी सामाजिक न्याय विभागाने मोठा निर्णय घेतला आहे. जात प्रमाणपत्र नसल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांच्या उच्चशिक्षण प्रवेशाला विलंब झाला आहे. या पार्श्वभूमीवर आता विद्यार्थ्यांना शाळेतच जातप्रमाणपत्र मिळणार आहे. सामाजिक न्याय विभागाने घेतलेल्या निर्णयामुळे अनेक विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. यामध्ये निवासीशाळा व आश्रमशाळेतील प्रवेशित मुलांचा समावेश करण्यात आला आहे.
एक लाख विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र
अनुसूचित जातीतील जवळपास पावणे दोन लाख विद्यार्थ्यांना यामुळे दिलासा मिळणार आहे. राज्यातील निवासी व आश्रमशाळांमधील पाचवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना हे प्रमाणपत्र दिले जाणार आहे. ६ डिसेंबर पर्यंत १ लाख विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या निर्णयामुळे आता शाळेतच जात प्रमाणपत्र उपलब्ध होऊन पुढील महाविद्यालयीन प्रवेश प्रक्रिया सुलभ होणार आहे.
( हेही वाचा : लवकरच राज्यात पहिल्या वर्गापासून शाळा सुरू होणार? )
विद्यार्थ्यांना दिलासा
दहावीनंतर महाविद्यालयीन प्रवेशासाठी जातप्रमाणपत्र हवे असल्यास किचकट प्रक्रियेचा सामना करावा लागत असे परंतु, या निर्णयामुळे प्रवेश प्रक्रिया सुलभ होऊन योग्य वेळेत प्रवेश घेणे शक्य होणार आहे. तसेच, निवासी व आश्रमशाळांमधील विद्यार्थी उच्च शिक्षणापासून वंचित राहणार नाहीत.
Join Our WhatsApp Community