सध्या राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप सुरु आहे. या संपात सहभागी कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्यावर घाबरून बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव आगारातील सहाय्यक तांत्रिक पदावर असलेले विशाल अंबलकर यांनी विष प्राशन केले होते. त्यांचा गुरुवारी, १८ नोव्हेंबर रोजी दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
सरकारच्या विरोधात असंतोष
विशाल अंबलकर यांनी निलंबनाच्या भीतीने विषारी औषध प्राशन करून आपली जीवनयात्रा संपवण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर त्यांना उपचारासाठी तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र मृत्यूशी २४ तासांच्या आत त्यांची झुंज अपयशी ठरली. त्यांच्या मृत्यूनंतर सरकार ‘अजून किती बळी घेणार?’ असा संतप्त सवाल आता विचारला जात आहे. गेल्या अनेक दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू अनेक एसटी कर्मचारी टोकाचे पाऊल उचलत आहेत. बुलढाणा जिल्ह्यातील माटरगाव येथील रहिवासी विशाल अंबलकर यांनी सुद्धा निलंबनाच्या भीतीपोटी विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. काल त्यांना खामगाव येथील सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले होते. त्यानंतर प्रकृती बिघडल्यामुळे अकोला येथे पाठवण्यात आले होते. मात्र अकोल्यात उपचारा दरम्यान या एसटी कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे.
(हेही वाचा गोपीचंद पडळकरांच्या जीवाला धोका! फडणवीसांचे सरकारला पत्र)
Join Our WhatsApp Community