मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने पुढील तीन ते चार तासांत मुंबईसर उर्वरित कोकण आणि मध्य महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटासह मेघगर्जनेत पाऊस पडेल, असा अंदाज व्यक्त केला आहे. दुपारी तीन वाजता हा अंदाज जाहीर करण्यात आला आहे. मुंबईसह, पालघर, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि मध्य महाराष्ट्रात पुणे, सातारा तर बीड, परभणीतही पाऊस हजेरी देण्याची शक्यता आहे. याचसोबत वा-यांचा वेगही जास्त राहील, त्यामुळे काळजी घेण्याचं आवाहन मुंबई प्रादेशिक हवामान खात्याकडून करण्यात आले आहे.
(हेही वाचा – परमबीर सिंग आहेत कुठे? सर्वोच्च न्यायालयाने खडसावून विचारले)
आवश्यक ती काळजी घ्या
बुधवारी मुंबईत सायंकाळी आणि रात्री पाऊस झाला. त्यामुळे सकाळी ऊन, सायंकाळी पाऊस आणि रात्री पावसाच्या प्रभावामुळे थंड वातावरण असा अनुभव मुंबईकरांना येतोय. पावसाचा प्रभाव कोकण आणि मध्य महाराष्ट्रातही दिसून येत आहे. मात्र गुरुवारी जाहीर केलेल्या अंदाजानुसार वा-यांचा वेग ३० ते ४० किलोमीटर प्रती वेगाने या सर्व भागांतून वाहेल, त्यामुळे आवश्यक ती काळजी घ्या, असंही मुंबई प्रादेशिक हवामान खात्यानं सांगितलं आहे.
१९ नोव्हेंबरपासून पावसाला सुरुवात
कोकण आणि मध्य महाराष्ट्रात विजांच्या कडकडाट आणि मेघगर्जनेसह २१ नोव्हेंबरपर्यंत तर विदर्भात उद्या १९ नोव्हेंबरपासून पावसाला सुरुवात होईल. विदर्भात पावसाचा प्रभाव १२ नोव्हेंबरपर्यंत जाणवेल, असा अंदाज आहे.
Join Our WhatsApp Community