वडाळ्यातील भक्तीपार्क या ठिकाणी धक्कादायक घटना समोर आली आहे. एका ७० वर्षीय महिलेने ५५ वर्षाच्या पुरुषाच्या पाठीत डोक्यात हातोड्याने प्रहार करून त्याची हत्या केली आहे. हत्या करण्यात आलेल्या पुरुषाने तरुणपणी तिचे आणि तिच्या अल्पवयीन मुलीचे आयुष्य खराब केल्याचा राग मनात ठेवून ही हत्या केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी वडाळा टिटी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून ७० वर्षीय महिलेला अटक केली आहे.
असा घडला प्रकार
इ.स.१९८४ साली देशात झालेल्या शीख दंगलीत पती मारला गेल्यावर आपल्या ११ वर्षाच्या मुलीला घेऊन मुंबईत आलेली रेश्मा (नाव बदलले) हिने स्वतःचे आणि मुलीचे पालन करण्यासाठी लहान मोठे कामे सुरू केले होते, चार घरी जाऊन भांडीकामे करणे हे कामे करीत असताना सुताराचे काम करणारा रामलाल (नाव बदलले) याच्यासोबत तिची ओळख झाली होती. रामलाल हा रेश्मा पेक्षा वयाने खूप लहान होता त्यानंतरही त्याने तिची आणि तिच्या मुलीची जवाबदारी घेण्याची तयारी दर्शवली होती. रेश्मा तिची मुलगी आणि रामलाल हे तिघे एकत्र राहू लागले होते.
राग डोक्यात असल्याने केली हत्या
रामलाल हा घरातील फर्निचर बनवण्याचे लहानसहान कंत्राटे घेत होता. रामलाल हा रेश्मा सोबत तिच्या मुलीचा गैरफायदा घेत होता, त्यातच रेश्माची ११ वर्षाची मुलगी रामलाल पासून गर्भवती राहिली होती. ही गोष्ट रेश्माला कळताच तिने तांडव केला असता रामलालने तिच्या सोबत लग्न करण्याचे रेश्माला वचन दिले. रेश्माने दोघांचा विवाह एका मंदिरात लावून दिला होता. मात्र या दोघांच्या लग्नाचे कागदोपत्री नोंद करण्यात आलेली नव्हती. रामलाल हा रेश्मा आणि तिच्या मुलीचा उपभोग घेत होता याचा राग रेश्माच्या डोक्यात होता मात्र ती काहीच करू शकता नव्हती. इकडे रेश्माच्या मुलीला एक मुलगी झाली तिने मुलीचा बाप म्हणून रामलाल याचे नाव लावले होते. वर्षे उलटून गेले होते, रेश्माची मुलगी एका इमिटेशन ज्वेलरीमध्ये काम करू लागली होती, त्यात रेश्माची नात मोठी झाली होती. रेश्माचे वय झाले होते मात्र रामलाल बाबतचा राग तिच्या डोक्यात अजूनही होता.
(हेही वाचा – पडळकरांच्या जिवाला धोका नाही! मंत्री अनिल परब यांची भूमिका )
रामलाल हा कंत्राटे घेत होता व त्याने भक्तीपार्क वडाळा या ठिकाणी हेव्ही डिपॉझिटवर घर घेतले होते. रामलाल याला ब्रेनस्ट्रोक आल्यामुळे त्याला एका डोळ्याने दिसण्यास बंद झाले तसेच त्याला स्मृतिभ्रंशचा आजार जडला, आणि तो घरातच राहू लागला. १५ नोव्हेंबर रोजी दुपारी रामलालच्या साईडवरील काही मित्र भेटायला आले असता रामलाल हा खातेवरून खाली पडला होता व रेश्मा ही घरात बसलेली होती, मित्रांनी रेश्माला रामलाल बाबत विचारले असता त्याची तब्येत ठीक नसल्याचे तीने सांगितले. मात्र एकाला रहावले न गेल्यामुळे त्याने घरात घुसून रामलालच्या चेहऱ्यावरील चादर बाजूला केली असता त्याच्या डोक्यावर वळ आढळून आले व त्यांनी रेश्माला विचारले असता “वो सो रहा है” असे तीने सांगितले मात्र काहितरी गडबड असल्याची शंका येताच मित्रांनी पोलिसांना कळवले.
वडाळा ट्रक टर्मिनस पोलीसानी घटनास्थळी येऊन रामलाल याला रुग्णालयात आणले मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. बुधवारी रामलाल याच्या शवविच्छेदन अहवाल आला असता त्याची हत्या झाल्याचे समोर आले. पोलीसानी रेश्माला ताब्यात घेऊन चौकशी केली असता तिने सर्व हकीकत पोलिसाना सांगितली. वडाळा टिटी पोलिसांनी रेश्माला अटक केली.
Join Our WhatsApp Community