वीर सावरकरांच्या चरणी आणल्या शिवशाहिरांच्या अस्थी

166

वीर सावरकरांनी छत्रपती शिवाजी महाराजांना आपले आराध्य दैवत मानले होते. तर छत्रपती शिवाजी महाराजांचे शिवचरित्र जनसामान्यांपर्यंत आणि प्रत्येक घरा-घरात पोहोचवण्याचं काम शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी केले. विशेष म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या दादर येथील राष्ट्रीय स्मारकात गुरुवारी शिवशाहीर बाबा साहेब पुरंदरे यांचा अस्थी कलश आणण्यात आला.

श्री शिवप्रतिष्ठानाचे कार्य

पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे यांचा अस्थी कलश श्री शिवप्रतिष्ठानतर्फे छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडावर आणि राज्याच्या ऐतिहासिक स्थळी नेण्यात येत आहे. आयुष्यभर शिव चरित्राचा प्रसार बाबासाहेब पुरंदरे यांनी केला. त्यामुळेच यांच्या या अस्थी दर्शनाने आता लोकांना ऐतिहासिक वासरा जपण्याच्या प्रेरणा देऊ शकतील, हीच त्यांच्या इतिहासपुरुषांची खरी भक्ती आहे, असा श्री शिवप्रतिष्ठानाचा मुख्य उद्देश आहे. या पार्श्वभूमीवर स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकातील वीर सावरकरांच्या पुतळ्यासमोर अस्थि कलश ठेवण्यात आला. यावेळी इतिहासप्रेमी आणि दादरकरांनी या अस्थि कलशाचे दर्शन घेतले.

एक शिव उपासक आणि दुसरा शिव चरित्र प्रचारक

स्वातंत्र्यवीर सावरकरांनी छत्रपती शिवाजी महाराजांना नेहमीच आपले आराध्य दैवत मानले. त्याच भक्तीतून त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची आरती आणि गीत रचले. तसेच बाबासाहेब पुरंदरे यांचे जीवनही छत्रपती शिवाजी महाराजांना समर्पित होते, त्यांना वीर सावरकरांकडून प्रेरणा मिळाली. ही गोष्ट बाबासाहेब पुरंदरे यांनी सांगितली होती. ती प्रेरणा आत्मसात करून बाबासाहेबांनी शिव चरित्र जनसामान्यांपर्यंत नेण्याचे काम सुरू केले. जाणता राजासारखी नाटके लिहिली आणि रंगवली. छत्रपती शिवाजी महाराजांना आपले सर्वस्व मानणाऱ्या मानबिंदू वीर सावरकर यांच्या स्मारकात बाबासाहेब पुरंदरे यांच्या प्रतिकांचे आगमन हा इतिहास आहे, जो हिंदुत्वाचा प्रकाश जागृत ठेवणाऱ्यांसाठी नक्कीच मार्गदर्शक ठरेल. त्यामुळे एक शिव उपासक आणि दुसरा शिव चरित्र प्रचारक असल्याने आलेला हा योगायोग म्हणावा लागेल.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.