शरद पवारांचे नाव दिल्लीत कुणी घेत नाही! निलेश राणेंचा हल्लाबोल

113

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नुकतेच एका सभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पर्याय निर्माण करण्याची गरज आहे, असे वक्तव्य केले होते, त्यावर टीका करताना भाजपचे नेते निलेश राणे यांनी ट्विटरद्वारे त्यांच्यावर जहरी टीका केली.

काय म्हणाले निलेश राणे? 

शरद पवार यांनी दिल्लीच्या राजकारणावर केलेल्या भाष्यावर टीका करताना यासंबंधी बोलताना निलेश राणे म्हणाले, ज्यांना कधी १० खासदार निवडून आणता आले नाही, ते ३०० खासदार निवडून आणलेल्या व्यक्तीला आव्हान देणार? पवार साहेबांचे नाव दिल्लीत कोण घेत नाही आणि त्यांची कोण दाखल ही घेत नाही, पवारांनी इतक्या वर्षात जे असंख्य विषय महाराष्ट्राचे केंद्राकडे आहेत त्या पैकी १ प्रश्न मार्गी लावलेला दाखवा? अशा शब्दांत निलेश राणे यांनी आव्हान दिले.

(हेही वाचा नेमके एसटीच्या प्रश्नावरच पवार गप्प का? सदाभाऊ खोतांचा थेट सवाल)

काय म्हणालेले शरद पवार? 

विदर्भाच्या दौऱ्यावर असताना शरद पवार म्हणाले होते की, केंद्रातील भाजप सरकारच्या विरोधात जनतेमध्ये प्रचंड असंतोष खदखदत आहे. आगामी लोकसभेच्या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पराभूत करायचे असेल तर मतदारांना पर्याय उपलब्ध करून देणे गरजेच आहे. यासाठी तिसऱ्या आघाडीचे नेतृत्व कोणी करावे हे आमच्यासाठी महत्त्वाचे नाही. या तिसऱ्या आघाडीचे नेतृत्व ममता बॅनर्जी करतील किंवा कोणी आणखी नेता हे महत्त्वाचे नाही. सद्यस्थितीत विरोधकांनी एकत्रितपणे येणे जास्त आवश्यक आहे. यादृष्टीने हिवाळी अधिवेशनादरम्यान विविध पक्षांशी चर्चा होईल, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार म्हणाले होते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.