देशातील स्मार्टफोनधारक विद्यार्थ्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. मागच्या तीन वर्षात स्मार्टफोनधारक विद्यार्थ्यांच्या संख्येत तब्बल 85 टक्क्यांनी वाढ झाली आहे. सुमारे 67 टक्के लोकांच्या घरात स्मार्टफोन आहेत. पण, अजूनही 26 टक्के विद्यार्थी हे स्मार्टफोन पासून वंचित राहिले आहेत. असे नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या 16 व्या वार्षिक शैक्षणिक स्थिती अहवालातून स्पष्ट झाले आहे.
असा करण्यात आला सर्वे
कोरोनामुळे जी शिक्षणाची पद्धत बदलली आहे. त्याचा वेध घेण्यासाठी हा सर्वे करण्यात आला. या सर्वेनुसार, कोरोनाच्या या बदललेल्या शिक्षण पद्धतीमुळे विद्यार्थ्यांच्या स्मार्टफोन वापरण्यात वाढ झाली आहे. यात 85 टक्के वाढ झाली असली तरी, 26.1 टक्के विद्यार्थी मात्र स्मार्टफोनपासून वंचित राहिले आहेत. तसेच, घरात वयाने मोठ्या असलेल्या मुलाला स्मार्टफोन वापरण्यास प्राधान्य दिले जाते, असा निष्कर्ष या अहवालातून काढण्यात आला आहे.
विशेष म्हणजे कुटुंबाच्या आर्थिक स्थितीची स्मार्टफोन घेण्यावर फारसा फरक पडत नाही. मात्र, पालकांच्या शैक्षणिक पात्रतेचा त्यावर परिणाम होत आहे. ज्या विद्यार्थांचे पालक इयत्ता नववी अथवा त्याहून अधिक शिकले आहेत, अशा 80 टक्के मुलांकडे स्मार्टफोन आहे. तर इयत्ता पाचवी अथवा त्याहून कमी शिकलेले पालक असलेल्या 50 टक्के मुलांकडेच स्मार्टफोन आहे, असे चित्र दिसून आले आहे. एकूण 25 राज्ये आणि तीन संघराज्य प्रदेशांमध्ये या अहवालासाठी सर्वेक्षण करण्यात आले. कोरोना काळात बंद पडलेल्या आणि नंतर पुन्हा सुरु झालेल्या 4 हजार 872 शाळा आणि सर्वेक्षणावेळी बंद असलेल्या 2 हजार 427 शाळांना फोनद्वारे संपर्क करुन डेटा करण्यात आला.
(हेही वाचा : धक्कादायक! मुंबईत १४ हजार बालकांना कोरोनाचा विळखा! )
Join Our WhatsApp Community