आर्यन खानची हजेरी कधी होणार बंद? वाचा सविस्तर

142

क्रूझ ड्रग्स प्रकरणात जामिनावर बाहेर पडलेल्या आर्यनला प्रत्येक शुक्रवारी हजेरीसाठी एनसीबी कार्यालयात जावे लागते. आज देखील तो एक मोठ्या आलिशान मोटारीतून एनसीबीच्या कार्यालयात दाखल झाला होता. आर्यनचे हे हजेरीपट या प्रकरणात दोषारोप पत्र टाकले जात नाही तो पर्यत सुरू राहणार आहे.

क्रूझ ड्रग्स प्रकरणात एनसीबीकडून अटक करण्यात आलेला सुपरस्टार शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान हा सध्या जामिनावर बाहेर आहे. तब्बल एक महिन्यानंतर आर्यन खान हा जामिनावर आर्थर रोड तुरुंगातून बाहेर आला आहे. परंतु आर्यनला न्यायालयाने जामीन दिला असला तरी या जामिनासाठी काही अटी शर्ती घातल्या गेलेल्या आहेत. त्यापैकी महत्वाची अट म्हणजे तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर आठवड्यातून एक दिवस एनसीबी कार्यालयात हजेरी लावावी लागेल. या अटीनुसार आर्यन खान हा तुरुंगातून बाहेर आल्यानंतर दर शुक्रवारी ११ ते ५ च्या दरम्यान एनसीबीच्या कार्यालयात येऊन हजेरी लावून जातो. आर्यन खान हजेरीसाठी येणार असल्यामुळे प्रत्येक शुक्रवारी वृत्तवाहिन्या तसेच वृत्तपत्र छायाचित्रकार यांचे कॅमेरे त्याच्या वाटेवर लागलेले असतात.

(हेही वाचा – देशात समान नागरी कायदा लागू करा, उच्च न्यायालयाची सूचना)

दर शुक्रवारी एनसीबीच्या कार्यालयात हजेरी

आर्यन खान प्रत्येक शुक्रवारी एनसीबीच्या कार्यालयात हजेरीसाठी येतो हे समजल्यानंतर त्याची एक झलक बघण्यासाठी त्याचे काही चाहत्यांची प्रत्येक शुक्रवारी एनसीबी कार्यालयाबाहेर गर्दी होऊ लागली आहे. प्रत्येक शुक्रवार प्रमाणे आजही आर्यन खान हजेरीसाठी एनसीबी कार्यलायत पांढऱ्या रंगाच्या आलिशान मोटारीतून आला होता. त्यानंतर हजेरी लावून आर्यन अर्ध्यातासातच एनसीबी कार्यालयातून बाहेर पडला. आर्यनला हजेरीसाठी जाताना सोबत एक डायरी घेऊन जावी लागते. या डायरीवर गुन्हयातील तपास अधिकारी हा सही शिक्का मारून ती डायरी आर्यनला परत दिली जाते. तसेच आर्यन हजेरीसाठी येऊन गेल्याची नोंद स्टेशन डायरीत करावी लागते.

यानंतर बंद होणार हजेरी 

एनसीबीकडून जो पर्यत क्रूझ ड्रग्स पार्टी प्रकरणात न्यायालयात दोषारोप पत्र जोपर्यंत दाखल करण्यात येत नाही, तो पर्यत आर्यन खान मागे लागलेली प्रत्येक शुक्रवारची हजेरी कायम राहणार आहे. दोषारोप पत्र दाखल करतेवेळी आर्यनला न्यायालयात हजर रहावे लागणार आहे. मात्र दोषारोप पत्र दाखल झाल्यानंतर न्यायालयाकडून देण्यात येणाऱ्या तारखेला न्यायालयात हजर रहावे लागणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.