मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर मणक्यावरील झालेल्या शस्त्रक्रियेनंतर गुरुवारी सकाळी दुसरी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे, अशी बातमी शुक्रवारी इंग्रजी वर्तमानपत्राने प्रसिद्ध केली आहे. ही बातमी चुकीची असल्याचे एच.एन.रिलायन्स रुग्णालयाने प्रसिद्धीपत्रकाच्या मार्फत जाहीर केले.
मानेच्या त्रासामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे १० नोव्हेंबरपासून चर्नीरोड येथील एन एन रिलायन्स रुग्णालयात दाखल आहेत. १२ नोव्हेंबर रोजी त्यांच्या पाठीच्या मणक्याची शस्त्रक्रियाही करण्यात आली. पुढील उपचारांसाठी तसेच तब्येत सुधारणा होईपर्यंत ठाकरे रुग्णालयातच थांबले आहेत. मात्र गुरुवारी मणक्यात रक्ताच्या गुठळ्या झाल्याने त्यांना दुस-यांदा शस्त्रक्रियेला सामोरे जावे लागले, अशा आशयाची बातमी इंग्रजी वर्तमानपत्रातून प्रसिद्ध करण्यात आली. या बातमीचे रुग्णालय प्रशासनाने खंडन केले. मुख्यमंत्र्यांच्या सुधारणा प्रक्रियेत बाधा घालण्याच्या उद्देशाने ही बातमी केल्याचा आरोपही रुग्णालयाने केला आहे. आम्ही रुग्णांची वैयक्तिक माहिती जपतो, असेही स्पष्टीकरण एच.एन.अंबानी फाऊंडेशन रुग्णालयाकडून दिले गेले आहे.
…म्हणून करण्यात आली शस्त्रक्रिया
बुधवारी संध्याकाळी एच. एन. रिलायन्स रुग्णालयात मुख्यमंत्र्यांना दाखल केल्यानंतर त्यानंतर संध्याकाळी त्यांच्यावर कोणत्याही चाचण्या करण्यात आल्या नाहीत. मात्र गुरुवारी डॉक्टरांशी चर्चा करून त्यांच्यावर विविध वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्या. अशी माहिती आहे की, गुरुवारी सायंकाळी या चाचण्यांचे अहवाल आल्यानंतर त्यावरून वरिष्ठ डॉक्टर आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा झाली. रुग्णालयात दाखल होण्यापूर्वीच डॉक्टरांनी एक छोटी शस्त्रक्रिया करण्यासंदर्भात उद्धव ठाकरे यांना सल्ला देण्यात आला होता. मात्र ही सर्व्हायकल आणि स्पायनल कॉड शस्त्रक्रिया आवश्यक असल्याचे त्यांना डॉक्टरांनी सांगितले होते. त्यामुळे आज सकाळी त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली.
Join Our WhatsApp Community