चहल ठरले ‘त्या’ मानाच्या पुरस्काराचे मानकरी

229

‘मुंबई मॉडेल’ च्या माध्यमातून आरोग्य व्यवस्थापनामध्ये आदर्श उदाहरण निर्माण केल्याबद्दल मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल यांना ‘क्विम्प्रो २०२१’ हा पुरस्कार व पदक प्रदान करुन सन्मानित करण्यात आले आहे.आरोग्य व शिक्षण यासह विविध क्षेत्रांमध्ये गुणवत्तापूर्ण सुधारणा करण्यासाठी कार्यरत क्विम्प्रो फाऊंडेशनद्वारे हा पुरस्कार, पदक तसेच प्रशस्तिपत्र चहल यांना समारंभपूर्वक प्रदान करण्यात आले.  या फाऊंडेशनच्या माध्यमातून १९८९पासून केवळ चार वेळा पुरस्कार दिला गेला आहे. त्यामुळे हा पुरस्कार मानाचा मानला  जात आहे.

Iqbal Chahal 1

फक्त चार वेळादेण्यात आला  पुरस्कार 

दुस-या महायुद्धानंतर बेचिराख झालेल्या जपान देशाला सावरण्यासाठी गुणवत्ता सुधारणा आणि गुणवत्ता व्यवस्थापन याअनुषंगाने मार्गदर्शन करणारे आणि ‘क्वालिटी गुरु’ म्हणून जगभरात नावाजलेले डॉ. जे. एम. जुरान यांनी भारतातही गुणवत्तेवर भर देणारी राष्ट्रीय संस्कृती निर्माण व्हावी म्हणून, क्विम्प्रो फाऊंडेशनच्या स्थापनेला बळ दिले. तसेच आरोग्य व शिक्षण या क्षेत्रांचे अनन्यसाधारण महत्व लक्षात घेता, या क्षेत्रांमध्ये असाधारण कामगिरी करणाऱ्या मान्यवरांना गौरविण्यासाठी ‘क्विम्प्रो’ पुरस्कार सुरु करण्याची संकल्पनाही त्यांनी दिली. त्यानुसार या फाऊंडेशनच्यावतीने सन १९८९ पासून आतापर्यंत फक्त चार वेळा पुरस्कार देण्यात आले आहेत. त्यासाठी अत्यंत असाधारण कामगिरी हा निकष प्रामुख्याने लक्षात घेतला जातो.

यापूर्वीही विविध पुरस्कार व सन्मान प्राप्त 

मुंबई महानगरामध्ये कोविड-१९ विषाणू संसर्ग परिस्थिती रोखण्यासाठी वॉर्ड वॉर रुम अर्थात विभागीय नियंत्रण कक्षांची अनोखी संकल्पना राबवून केलेले कोविड रुग्ण व्यवस्थापन, वैद्यकीय उपचारांसाठी अल्पावधीमध्ये उभारलेली निरनिराळी जम्बो कोविड सेंटर्स, टेस्टींग-ट्रेसिंग-ट्रॅकींग-ट्रिटमेंट या सूत्राच्या आधारे राबविलेली धोरणे, कोविड व्यवस्थापनामध्ये एकूणच प्रेरणादायी ठरलेले ‘मुंबई मॉडेल’, धारावीसारख्या मोठ्या झोपडपट्टीमध्ये कोविडवर राखलेले नियंत्रण अशा सर्वंकष कामगिरीचे नेतृत्व करुन, असाधारण अंमलबजावणी केल्याबद्दल कौतुक करीत महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांना क्विम्प्रो फाऊंडेशनने पदक, पुरस्कार व प्रशस्तिपत्र प्रदान करुन सन्मानित केले आहे. कोविड व्यवस्थापनातील या यशस्वी कामगिरीबद्दल चहल यांना यापूर्वीही विविध पुरस्कार व सन्मान प्रदान करण्यात आले आहेत.

(हेही वाचा :मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर दुसरी शस्त्रक्रिया? )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.