भावी पत्नीला भावी पतीने अश्लील संदेश पाठवला आणि महिलेला त्यावेळी त्यात आक्षेप घ्यावा असे वाटले नसेल तर त्यात काही गैर नाही, असे मुंबईच्या एका न्यायालयाने म्हटले आहे. तसेच, भावी पत्नीला अश्लील मेसेज पाठवणं गुन्हा आहे का? यासंदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय देताना म्हटले की, लग्नाचे आमिष दाखवत बलात्कार केल्याच्या आरोपाच्या प्रकरणात न्यायालयाने एका व्यक्तीची निर्दोष मुक्तता केली आहे. यावेळी निर्णय देताना न्यायालयाने असे म्हटले, लग्नाआधी भावी पत्नीला अश्लील मेसेज पाठवणे हा एखाद्याच्या प्रतिष्ठेचा अपमान होऊ शकत नाही.
(हेही वाचा – प्रकाश आंबेडकरांकडून वानखडेंची पाठराखण, म्हणाले…)
असा केला होता आरोप
एका इंग्लिश वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, एका ३६ वर्षांच्या पुरुषाला कौटुंबिक कारणामुळे लग्न करता आले नाही. पुढे त्या दोघांमध्ये तणाव वाढला. या तणावातूनच पुरुषाविरोधात लग्न होण्याआधी पाठवलेल्या अश्लील संदेशाचे निमित्त करुन आरोप करण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, लग्नाचे वचन देऊन फसवणूक करणे आणि बलात्कार करणे असे आरोप करण्यात आले. या प्रकरणात २०१० मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि २०२१ मध्ये कोर्टाचा निर्णय आला आहे.
कोर्टाने काय म्हटले…
भावी पतीने भावी पत्नीला केलेल्या मॅसेजमुळे आनंद होऊ शकतो, असे नाही तर होणाऱ्या पत्नीच्या प्रतिष्ठेचा अपमान होईल, असे कोर्टाने म्हटले आहे. २०१० मध्ये, महिलेने या व्यक्तीविरोधात एफआयआर दाखल केली होती. अशी माहिती मिळतेय. या जोडप्याची २००७ मध्ये मेट्रीमोनियल वेबसाईटवरुन ओळख झाली. तरूणाची आई या लग्नाच्या विरोधात होती. यामुळे २०१० मध्ये या तरूणाने तरुणीसोबतचे आपले नाते संपवले. कोर्टाने या युवकाला निर्दोष घोषित केले, आणि असे म्हटले की लग्नाचे वचन देणे आणि ते न पाळणे याला धोका देणं किंवा बलात्कार करणं म्हणता येणार नाही.