कोरोनानंतर दोन वर्षांनी व्यंगचित्र कार्यशाळा सुरू

प्रवेशासाठी इच्छुकांनी मोबाईल क्रमांक ९८१९५२३७४१ यावर संपर्क साधावा.

152

स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या दादर, शिवाजी उद्यानाजवळील वास्तुत शनिवारी २७ नोव्हेंबर २०२१ पासून नामवंत व्यंगचित्रकारांच्या मार्गदर्शनाखाली व्यंगचित्र कार्यशाळा सुरू करण्यात येत आहे. कोरोनामुळे सुमारे दोन वर्षे ही कार्यशाळा बंद करावी लागली होती. यामध्ये व्यंगचित्रविषयक संपूर्ण मार्गदर्शन केले जाते. प्रवेशासाठी इच्छुकांनी मोबाईल क्रमांक ९८१९५२३७४१ यावर संपर्क साधावा.

व्यंगचित्र कार्यशाळा

गेली ७ ते ८ वर्ष स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकामध्ये संजय मिस्त्री व विकास सबनीस यांच्या मार्गदर्शनाखाली व्यंगचित्रवर्ग सुरू आहेत. कार्यशाळेचा अभ्यासक्रमदेखील या दोन तज्ज्ञांनी बनवला असून विकास सबनीसांचा राजकीय व्यंगचित्रात विशेष हातखंड होता. तर, संजय मिस्त्री गेली ४० वर्षे लोकसत्ता, नवशक्ति, सामना अशा दैनिकांमधून काम करतात. या कार्यशाळेतून आजवर जवळपास २५० ते ३०० विद्यार्थ्यांनी प्रशिक्षण घेतले आहे. कार्यशाळेतील अनेक विद्यार्थ्यांना राजकीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर बक्षिसे मिळाली आहेत. यात साध्या चित्रांपासून सुरूवात करत, व्यंगचित्रातून उपजिविका कशी करायची, अर्थांजन कसे करायचे याचेही शिक्षण याठिकाणी देण्यात येते.

( हेही वाचा : देशात ‘या’ शहराला सलग पाचव्यांदा मिळाला, ‘स्वच्छ शहराचा’ मान! )

तज्ज्ञांचे मार्गदर्शन

या कार्यशाळे दरम्यान काही तज्ज्ञमंडळींकडून विशेष मार्गदर्शन केले जाते. आजवर शि.धा.फडणीस, राज ठाकरे, प्रतिभा वाघ तसेच यांसारख्या अनेक तज्ज्ञांचे विशेष मार्गदर्शन तासिका आयोजित केल्या जातात. कार्यशाळे दरम्यान अनेक मान्यवरांच्या मुलाखती घेण्याची विद्यार्थ्यांना संधी मिळते. भारतात परदेशी व्यंगचित्र आल्यास अथवा प्रदर्शन भरल्यास अशा ठिकाणी भेट दिली जाते.

*अधिक माहिती*
कालावधी – सहा महिने
वर्ग – आठवड्यातून एक दिवस

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.