होय, भाजपनेच ‘अमरावती बंद’ पुकारला होता! ‘ती’ प्रतिक्रिया होती!

173

त्रिपुरामध्ये जी घटना घडलीच नव्हती, त्याचे भांडवल करून अमरावतीमध्ये १२ नोव्हेंबर रोजी हिंसाचार घडवण्यात आला. तो पूर्वनियोजित होता. त्यावेळी विशिष्ट समाजाच्या घरांची, दुकानांची तोडफोड करण्यात आली. त्यामुळे आम्ही रस्त्यावर उतरलो, १३ नोव्हेंबर रोजी भाजपनेच ‘अमरावती बंद’ची हाक दिली, ती १२ नोव्हेंबर रोजीच्या घटनेची प्रतिक्रिया होती. मात्र सरकार १२ नोव्हेंबरच्या घटनेकडे दुर्लक्ष करून केवळ १३ नोव्हेंबरच्या घटनेवरच कारवाई करत आहे, असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र अफडणवीस यांनी केला.

देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी, २१ नोव्हेंबर रोजी अमरावतीतील हिंसेचाराचा आढावा घेतला. त्यानंतर या हिंसाचारात नुकसान झालेल्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. त्यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्ला चढवला.

(हेही वाचा एसटीच्या विलीनीकरणावर सरकार महाधिवक्त्यांशी चर्चा करणार!)

रझा अकदमीवर बंदी आणण्याची हिंमत दाखवा! 

रझा अकादमी काँग्रेसच्या काळातच दंगली करते आणि पोलिसांवर हल्ले करते. याआधीही रझा अकादमीने काँग्रेसच्या काळातच आझाद मैदानात मोर्चा काढला होता आणि पोलिसांवर हल्ले केले होते. आणि आता पुन्हा पोलिसांवर हल्ले केले आहेत. जर रझा अकादमी ही भाजपाची टीम बी असे म्हणता, तर आम्ही सरकारकडे मागणी करतो की, आता लगेच रझा अकादमीवर बंदी आणावी, सरकारची हिंमत होणार नाही. कारण रझा अकादमी कुणाचे पिल्लू आहे, हे सर्वांना ठाऊक आहे, असेही फडणवीस म्हणाले.

12 तारखेच्या घटनेवर सत्ताधारी चिडीचूप 

13 नोव्हेंबर रोजीची घटना ही 12 तारखेच्या घटनेची रिअॅक्शन होती. पण कोणत्याही हिंसेचे समर्थन आम्ही करत नाही. 12 तारखेची घटना डिलीट करून 13 तारखेच्या घटनेवर बोलत आहेत. सर्व कारवाई 13च्या घटनेवर सुरू आहे. 12च्या घटनेवर काहीच कारवाई नाही. त्यावर कोणताही नेता बोलत नाही. पालकमंत्री यशोमती ठाकूरही बोलत नाही. विशिष्ट धर्माच्या लोकांना टार्गेट करणे आम्हाला मान्य नाही. पण चुकीच्या घटनेचे  लांगूलचालन होत असेल तर आम्हाला मान्य नाही, असे सांगतानाच 12 तारखेच्या घटनेवर सत्ताधाऱ्यांनी चिडीचूप भूमिका घेतली आहे. त्याचे कारण काय? मतांचे ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न तर नाही ना? ही शंका वाटते, अशी शंका फडणवीस यांनी व्यक्त केली. राजकीय दबावाखाली पोलिस एकतर्फी कारवाई करत असतील, तर आम्हाला निषेध करावा लागेल, विरोध करावा लागेल. नाहीतर जेलभरो आंदोलन करू. खोट्या गुन्ह्यात टाकायचे असेल, तर आम्हीच तुरुंगात येतो. एकतर्फी कारवाई बंद करा, असे सांगतानाच या घटनेची गृहमंत्र्यांना माहिती दिली जाणार असल्याचे फडणवीस म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.