पाकिस्तानात हिंदू अल्पवयीन मुलाची निर्घृण हत्या!

147

पाकिस्तानातील सिंध प्रांतात एका 11 वर्षीय हिंदू मुलाची लैंगिक छळ करून निर्घृण हत्या करण्यात आली. मुलाच्या कुटुंबीयांनी सांगितले की, तो शुक्रवारी संध्याकाळी बेपत्ता झाला होता आणि शनिवारी त्याचा मृतदेह सिंध प्रांतातील खैरपूर मीर भागातील बाबरलोई शहरातील एका निर्जन घरात सापडला. ‘संपूर्ण कुटुंब गुरु नानक यांच्या जयंती उत्सवात व्यस्त होते. मुलगा कसा बेपत्ता झाला हे आम्हाला कळलंसुद्धा नाही’, असे मुलाच्या नातेवाईकांनी सांगितले आहे.

पोलिसांनी दोघांना अटक केली

याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लैंगिक अत्याचारानंतर गुन्हेगारांनी मुलाचा गळा आवळून खून केला. बाबरलोई पोलिस ठाण्याच्या एसएचओने दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या दोन आरोपींपैकी एकाने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. त्याचवेळी बाल संरक्षण प्राधिकरण, सुक्कूरचे जुबेर महार यांनी सांगितले की, मुलाच्या शरीरावर अत्याचाराच्या खुणा आढळून आल्या आहेत.

राज्यातील ही दुसरी घटना

गेल्या काही आठवड्यांत राज्यातील ही दुसरी घटना असल्याचेही त्यांनी सांगितले. याच्या काही काळापूर्वी सुक्कूर जिल्ह्यातील सालेह पाट येथे हिंदू समाजातील एक अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाली होती. याची माहिती पोलिसांना देण्यात आली, त्यानंतर पोलिसांनी तिच्या शोधासाठी  25 लाखांचे बक्षीस जाहीर केले, परंतु मुलीबद्दल अजून कोणतीही माहिती मिळालेली नाही.

 (हेही वाचा :विनोद तावडेंना मिळाली ‘ही’ मोठी जबाबदारी! )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.