टास्क फोर्स म्हणतेय शाळा बंदच ठेवा, शिक्षण विभागाचा विरोध!

206

सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होऊ लागला आहे. व्यवहार सुरळीत सुरु होऊ लागले आहे, म्हणून राज्याच्या शालेय विभागाने प्राथमिक शाळा सुरु करण्याचा विचार सुरु केला आहे. परंतु त्याला झाला टास्क फोर्सचा विरोध आहे. जोवर मुलांचे लसीकरण होत नाही, तोवर शाळा सुरु करणे धोक्याचे ठरू शकते, असे स्पष्ट मत टास्क फोर्सचे प्रमुख डॉ. संजय ओक यांनी मांडले आहे.

अमेरिकासारखी परिस्थिती आणू द्यायची नाही 

लसीकरण झालेली मुले शाळेत यायला हवीत. त्याकरता केंद्र सरकरने लवकरात लवकर लहान मुलांचे लसीकरण सुरू करावे. जरी मास्क ही पहिली लस आहे. तरीही नुकत्याच झालेल्या सणासुदीच्या दिवसांत लोकांनी मास्क टाळला. यामुळेच तिसरी लाट येणार नाही, असे म्हणता येणार नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधले. तिसऱ्या लाटेचे भूत आता मानेवरुन उतरवायचे का, याबाबत गेल्या सोमवारी चर्चा झाली, पण आम्ही ह्याला तयार नाही. तिसऱ्या लाटेचा अंदाज चुकल्याचा आनंद आपल्याला आहे. परंतु  अमेरिकेत मुलांचे बाधित होण्याचे प्रमाण इतके वाढले की मुलांना एका राज्यातून दुसऱ्या राज्यात शिफ्ट केले जात आहे. ही परिस्थिती आपल्याला राज्यात येऊ द्यायची नाही, असेही डॉ. ओक म्हणाले.

(हेही वाचा साहित्य संमेलन आणि मराठी भाषा शुद्धीकार वीर सावरकरांचा सन्मान)

शिक्षण विभागाचा मात्र विरोध 

शाळा सुरु झाल्यानंतर कोविड रुग्णसंख्या वाढलीच तरी प्रशासन पूर्ण सक्षम आहे. सार्वजनिक ठिकाणी गर्दीत लहान मुलांचा वावर वाढल्यानंतरही लहान मुलांमधील कोविड केसेस नगण्य आहेत. त्यामुळे, बगिचे, क्रिडांगणे, बाजार याठिकाणी लहान मुलांचा वावर वाढला असताना शाळा सुरु करण्यास हरकत नाही, असे मत शिक्षण विभागाचे आणि त्यापाठोपाठ मुंबई महापालिकेचेही आहे. त्यामुळे एका बाजूला टास्क फोर्सचा विरोध आणि दुसरीकडे शिक्षण विभागाचा आग्रह यात मधल्या मध्ये मुलांची हेळसांड होऊ लागली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.