काँग्रेसने दिवंगत नेते राजीव सातव यांच्या पत्नी प्रज्ञा सातव यांना उमेदवार म्हणून घोषित केल्याने विधान परिषद निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. महाविकास आघाडीने सातव यांना पाठिंबा दिला आहे. आमदार शरद रणपिसे यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या विधान परिषदेच्या जागेसाठी काँग्रेसकडून प्रज्ञा सातव यांना उमेदवारी देण्यात आली. भाजपा उमेदवाराने अर्ज मागे घेतल्यामुळे प्रज्ञा सातव यांची बिनविरोध निवड झाली आहे.
काँग्रेस पक्षाच्या उमेदवार डॉ. प्रज्ञा राजीव सातव यांची विधान परिषद पोटनिवडणुकीत बिनविरोध निवड झाली. महाविकास आघाडीने सातव यांना पाठिंबा दिला होता, भाजपा उमेदवारांने अर्ज मागे घेतल्याने सातव यांची बिनविरोध झाली. pic.twitter.com/O1mF6PxVIT
— Maharashtra Congress (@INCMaharashtra) November 22, 2021
काँग्रेस पक्षाच्या उमेदवार डॉ. प्रज्ञा राजीव सातव यांची विधान परिषद पोटनिवडणुकीत बिनविरोध निवड झाल्याबद्दल प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी अभिनंदन केले आहे. आपल्या ट्विटमध्ये थोरात म्हणतात, विधानपरिषद पोटनिवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या उमेदवार डॉ. प्रज्ञा राजीव सातव बिनविरोध विजयी झाल्या आहेत. त्यांचे हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा !महाविकास आघाडीतील मित्र पक्षांची खंबीर साथ व विरोधी पक्ष भाजपने आपला उमेदवार मागे घेऊन निवडणूक बिनविरोध केली त्याबद्दल त्यांचे आभार.
(हेही वाचा – वानखेडे यांची बदनामी : उच्च न्यायालयाकडून मलिकांना कानपिचक्या)
विधानपरिषद पोटनिवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या उमेदवार डॉ. प्रज्ञा राजीव सातव बिनविरोध विजयी झाल्या आहेत. त्यांचे हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा !महाविकास आघाडीतील मित्र पक्षांची खंबीर साथ व विरोधी पक्ष भाजपने आपला उमेदवार मागे घेऊन निवडणूक बिनविरोध केली त्याबद्दल त्यांचे आभार. pic.twitter.com/dxLKRSIzxF
— Balasaheb Thorat (@bb_thorat) November 22, 2021
राजीव सातवांच्या निधनानंतर प्रज्ञा राजकारणात सक्रिय
राजीव सातव यांच्या निधनानंतर प्रज्ञा सातव यांनी राजकारणात सक्रिय सहभाग घेतला. त्यामुळे त्यांना महाराष्ट्र प्रदेशच्या कार्यकारिणीत स्थान देण्यात आले होते. त्यांच्याकडे प्रदेश उपाध्यक्षपद देऊन पक्षाने जबाबदारी दिली होती. त्यानंतर त्या हिंगोली कळमनुरीत सक्रिय होत्या. महिलांच्या कार्यक्रमांना हजेरी लावण्यापासून ते मतदारसंघातील कामांबाबतचा आढावा घेण्यास त्यांनी सुरुवात केली होती. तसेच त्यांनी दिल्लीत जाऊन काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधींची भेट घेऊन चर्चाही केली असल्याचे सांगितले जात आहे.
Join Our WhatsApp Community