मुंबई कोरोनाच्या विळख्यातून ब-याच प्रमाणात बाहेर आली असली तरीही मुंबईत साथीच्या आजारांचा विळखा वाढत असल्याची माहिती पालिका आरोग्य विभागाने दिली आहे. गेल्या तीन आठवड्यांत मलेरिया, डेंग्यू, गॅस्ट्रो, चिकनगुनियाचे रुग्ण वाढत असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे. १ नोव्हेंबरपासून मुंबईत मलेरियाचे २३४, डेंग्यूचे ९१ तर गॅस्ट्रोचे २०० रुग्ण आढळून आलेत. त्यामागोमाग १२ रुग्ण चिकनगुनियाने त्रस्त असल्याचे दिसले आहेत. तर पावसाळ्यात हमखास दिसून येणारा लेप्टोचा आजारही नोव्हेंबर महिन्यात दिसून आला आहे. यासह मुंबईत ६ लेप्टोच्या रुग्णांची नोंद झाली आहे.
- पाहा यंदाच्या वर्षापासून मुंबईतील साथीच्या रुग्णांची यादी – १ जानेवारी ते २१ नोव्हेंबर
आजार – रुग्णांची संख्या – मृत्यू
- मलेरिया – ४ हजार ८१३ – ०
- लॅप्टो – २१६ – ४
- डेंग्यू – ८२१ – ३
- गॅस्ट्रो – २ हजार ५६४ – ०
- हेपेटायटीस – २५८ – ०
- चिकनगुनिया – ६० – ०
- स्वाईन फ्लू – ६४ – ०
साथीचे आजार नोव्हेंबर महिन्यातही दिसून येताहेत. त्यामुळे मुंबईकरांनी स्वतःचं आरोग्य सांभाळावं. पाणी उकळून प्यावं, असे आवाहन मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.
Join Our WhatsApp Community