गोव्यात ख्रिसमस उत्सवादरम्यान आत्मघातकी हल्ले करण्याच्या इस्लामिक स्टेट आयएसआयएसचा कट आहे. यासाठी ही इस्लामिक दहशतवादी संघटना आत्मघाती हल्ला घडवण्यासाठी स्थानिक तरूणांची भरती करत आहे. या करता ही इस्लामिक दहशतवादी संघटना सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर करत असल्याची धक्कादायक बाबा समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार,सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर करून आयएसआयएसचा प्रचार करण्यासाठी तशा प्रकारच्या पोस्ट व्हायरल करणारे अनेक अकाऊँट तयार करण्यात आले आहेत.
गैर-मुस्लिमांबद्दल द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न
तरूणाईत सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या सोशल मीडिया अॅप्लिकेशनचा वापर करून ही इस्लामिक संघटना गैर-मुस्लिमांबद्दल द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. एका अहवालानुसार, समोर आलेल्या व्हिडिओंपैकी एक व्हिडिओत लोकांना ख्रिसमसच्या सुट्ट्यांमध्ये पाश्चात्य देशांमध्ये दहशतवादी हल्ले करून मोठ्या प्रमाणावर जीवितहानी करण्यास प्रोत्साहित केले आहे. व्हिडिओमध्ये ख्रिसमसचे वर्णन “कुफार आणि क्रुसेडर्सचा उत्सव” असे केले आहे. त्यामध्ये असे म्हटले आहे, “ते अल्लाहवर विश्वास ठेवत नाहीत आणि ते इस्लामिक पवित्राची थट्टा करतात. व्हिडिओमध्ये ख्रिसमस मार्केट आणि सेलिब्रेशनची अनेक दृश्ये दर्शविण्यात आली होती आणि या व्हिडिओत पुढे , “हे अल्लाहच्या सैनिकांनो , या कुफारांचे रक्त सांडण्यासाठी स्वतःला तयार करा.”असे आवाहन करण्यात आले आहे.
(हेही वाचा – आव्हाडांना ‘ते’ वक्तव्य भोवले! प्रत्यक्ष हजर रहा! उच्च न्यायालयाचा आदेश)
पुन्हा एकदा हल्ले घडवण्याचा कट
हल्ले घडवून आणण्यास प्रोत्साहित करणारे व्हिडिओ ज्या अकाऊंटवरून प्रसारित केले जात आहे. ते अकाऊंट गेल्या १८ महिन्यांपासून सक्रिय आहे. अशाप्रकारचे व्हिडिओ एका अकाऊंटवर अपलोड करण्यात आला होते ज्याचा वापर आयएसआयएसचा प्रचार करण्यासाठी केला जात असल्याचे सांगितले जात आहे. धक्कादायक म्हणजे एप्रिल २०१९ मध्ये आयएसआयएसने इस्टरच्या दिवशी श्रीलंकेमध्ये सीरियल बॉम्ब हल्ला घडवण्यात आला होता. बेट राष्ट्राच्या ३ शहरात ८ विविध ठिकाणी एकाच वेळी झालेल्या हल्ल्यांमध्ये शेकडो लोकं मारले गेले तर बरेच जखमी झाले होते. यानंतर आता चिंताजनक म्हणजे आयएसआयएस पुन्हा एकदा ख्रिसमन उत्सवादरम्यान हल्ले घडवण्याचा कट करत आहे.
Join Our WhatsApp Community