आमदाराला सेक्सटॉर्शनच्या जाळ्यात अडकवणारा गजाआड

128

शिवसेनेच्या एका आमदाराला सेक्सटॉर्शनच्या जाळ्यात अडकवणारा महाभाग राजस्थानमध्ये पोलिसांच्या ताब्यात आला. त्याला अटक करण्यात आली. मौसमदीन मेव असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. सोमवारी राजस्थानमधील एका २८ वर्षीय तरुणाला मुंबई पोलिसांच्या सायबर सेल युनिटने अटक केली. मिळालेल्या माहितीनुसार,  राजस्थानमधील सिकारी जिल्ह्यातील मौसमदीन मेव असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. २० ऑक्टोबर रोजी मेवने महिला असल्याचे भासवून शिवसेना आमदाराकडे मदत मागितली आणि मेसेज करुन संपर्क साधला होता अशी माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे.

काय आहे प्रकरण?

तक्रारदार आमदार यांना २० ऑक्टोबरच्या रात्री एक संदेश आला होता. हा संदेश मौसमदीन नावाच्या व्यक्तीने एक महिला बनून पाठवला होता. तक्रारदार यांनी प्रतिसाद देताच पुढे दोघांमध्ये संभाषण सुरु झाले. चँटद्वारे आरोपीने आमदाराकडे मदत मागितली. त्यानुसार आमदाराने मदत करण्याचे आश्वासन दिले. काही वेळाने आमदारांना एका महिलेचा व्हिडिओ कॉल केला. महिलेने सुमारे १५ सेकंद आमदारांशी बोलून मदतीबाबत चर्चा केली. मात्र फोन कट होताच आमदारांच्या मोबाइलवर एक व्हिडिओ त्या महिलेने पाठवला.

(हेही वाचा – कंगणाने दुखावल्या शीख धर्मियांच्या भावना, मुंबईत गुन्हा दाखल)

आरोपींनी आमदाराचा आक्षेपार्ह व्हिडिओ बनवून त्यांना अश्लील व्हिडिओ क्लिप दाखवून ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. या प्रकरणी आमदाराने मुंबईत पोलिसांत तक्रार दिली, त्यानंतर आरोपीचा भरतपूर येथे शोध लागला. भरतपूर येथील सिकारी पोलिस ठाण्याच्या पथकाने आरोपीला त्याच्या गावातून पकडले. लवकरच या आरोपीचा ताबा मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेला दिला जाणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.