भारतीय पर्यटनाला चालना देण्यासाठी रेल्वमंत्र्यांनी अनोखी घोषणा केली आहे. या निर्णयाअंतर्गत कोणतेही राज्य सरकार किंवा खासगी कंपनी निश्चित कालावधीसाठी रेल्वे भाड्याने घेऊ शकते. रामायण रेल्वे ज्याप्रकारे प्रभू श्रीरामांच्या स्थळांना भेट देते त्याचप्रकारे देशातील इतर वारसा पर्यटनाला चालना देण्यासाठी रेल्वे मंत्रालयाकडून ‘भारत गौरव ट्रेन’ हा अनोखा उपक्रम राबवला जाणार आहे.
धावणार ‘भारत गौरव ट्रेन’
पर्यटनाला चालना देण्यासाठी एकूण ३ हजार ३३३ कोच म्हणजेच जवळपास १५० गाड्या रेल्वेने निश्चित केल्या आहेत. या योजनेअंतर्गत कोणतेही राज्य व खासगी पर्यटन कंपन्या भाडे तत्वावर रेल्वे आरक्षित करू शकता. याकरिता पर्यटन स्थळांची यादी, रेल्वे आरक्षित करण्यासाठीचे अर्ज आजपासून भारतीय रेल्वे मंत्रालयाकडून मागवण्यात आले आहे. अशी माहिती पत्र परिषदेच, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे. भारत गौरव ट्रेन, रामायण ट्रेनमुळे लोकांना भारतीय संस्कृती, आपली विविधता आणि वारसा यांची ओळख करून घेण्याची संधी मिळेल. रेल्वे येत्या काळात गुरुकृपा आणि सफारी ट्रेन चालविणार असल्याचेही रेल्वेमंत्री म्हणाले.
( हेही वाचा : दिवेआगरातील गणपती मंदिरात पुन्हा स्थापना झाली सुवर्ण गणेश मूर्ती )
अर्ज प्रक्रियेला सुरवात
रेल्वे आरक्षित करण्याच्या प्रक्रियेला आजपासून सुरूवात झालेली आहे. यामध्ये एसी, नॉन एसी, विस्टा डोम कोच अशा सर्व प्रकारच्या गाड्यांचा समावेश असणार आहे. याशिवाय रेल्वेचे मार्ग ठरविण्याचे अधिकार कंपनीला असतील. तसेच या ट्रेनचा तिकीट दर आरक्षित करणाऱ्या ऑपरेटरकडून ठरविण्यात येईल.
Join Our WhatsApp Community