क्रिप्टो करन्सीवर बंदी आणण्यासाठी हालचाली! किंमती गडगडल्या 

161

नवी दिल्ली संसदेचे हिवाळी अधिवेशन येत्या 29 नोव्हेंबरपासून सुरु होणार आहे. त्यामध्ये एकूण 26 विधेयके सादर करण्याची तयारी सरकारकडून करण्यात आली आहे. यामध्ये क्रिप्टोकरन्सीचे विधेयक सादर होणार आहे. क्रिप्टो करन्सीवर बंदी आणायची कि त्यावर कडक नियमावली लागू करायची यावर चर्चा होणार आहे. त्याचा परिणाम म्हणून आभासी चलनाचे दर गडगडले आहेत. सध्या या चलनात सर्वसाधारण नागरिकांनीही मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे.

rate

पंतप्रधानांनी जगभरातील देशांना केलेले आवाहन 

या अधिवेशनात 25 कायद्यांसह सर्व खासगी क्रिप्टोकरन्सीवर बंदी घालण्यासाठी एक विधेयक आणले जाणार आहे. क्रिप्टोकरन्सी अँड रेग्युलेशन ऑफ ऑफिशियल डिजिटल करन्सी बिल, 2021 ज्याला अद्याप मंत्रिमंडळाने अधिकृतपणे मान्यता दिलेली नाही. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाद्वारे जारी करण्यात येणाऱ्या अधिकृत डिजिटल चलनाच्या निर्मितीसाठी एक सोयीस्कर धोरण तयार करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया लवकरच अधिकृत डिजिटल चलनासाठी पायलट प्रोजेक्ट सुरू करण्याचा विचार करत आहे. काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘सिडनी डॉयलॉग’मध्ये बोलताना जगभरातील देशांना क्रिप्टोकरन्सीवर नियंत्रण आणण्याचे आवाहन केले होते. क्रिप्टोकरन्सीचे धोरण ठरवण्यासाठी लोकशाहीवादी देशांनी एकत्र यावे, असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले होते.

(हेही वाचा जावेद अख्तर हिंदूविरोधी, साहित्य संमेलनात बोलावू नका! ब्राम्हण महासंघाची भूमिका)

मनी लॉण्डरिंगचे प्रकार वाढण्याची भीती 

भारतात क्रिप्टोकरन्सीच्या वापराचा मार्ग मोकळा करणे योग्य आहे का यावर गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरु आहे. त्या पार्श्वभूमीवर आता आरबीआयने क्रिप्टोकरन्सी लॉन्च करण्यासाठी प्रयत्न सुरु केले असल्याची माहिती समोर आली आहे. आता संसदेत मांडण्यात येणाऱ्या या विधेयकात क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करणारे, डेव्हलपर, मायनिंग करणारे आणि इतर पैलूंवर सविस्तर चर्चा करण्यात येणार आहे. त्यामुळे भारतात क्रिप्टोकरन्सी कशी असेल यावर अधिक स्पष्टता येणार आहे. या आभासी चालनामुळे मनी लॉण्डरिंगचे प्रकार वाढतील, दशतवाद्यांचे व्यवहार होतील, तसेच कर बुडवेगिरीही वाढेल, म्हणून सरकार आता यावर निर्णायक भूमिका घेण्याच्या तयारीत आहे.

हे आहेत आभासी चलन! 

२००८पासून बिटकॉइनपासून सुरू झालेले आभासी चलनाचे व्यवहार लाइटकॉइन, रिपल, इथेरिअम, डॉजकॉइन, कॉइन्ये, नेम, डॅश, मोनेरो, ब्लॅककॉइन अशा अनेक आभासी चलनांमध्ये सध्या होत आहेत आणि जागतिक स्तरावर चलनव्यवस्था हलवून सोडत आहेत. या सर्वांमध्ये आद्य आभासी चलन आहे अर्थातच बिटकॉइन.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.