माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना ईडीने समन्स बजावले आहे. त्यांना 25 नोव्हेंबर रोजी चौकशीकरता ईडी कार्यालयात बोलावण्यात आले होते. मात्र कुंटे यांनी ईडीच्या कार्यालयात हजर होणे शक्य होणार नसल्याचे ईडीला कळवले आहे.
मंत्रिमंडळाच्या बैठकीचे दिले कारण
सध्या अटकेत असलेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या प्रकरणाशी आवश्यक माहिती ईडीला हवी आहे. त्यासाठी ईडीने सीताराम कुंटे यांना समन्स बजावले आहे. राज्यातील पोलिसांच्या बदल्यासंदर्भातील काही प्रकरणांसंदर्भातील वसुली झाल्याचा गंभीर आरोप देशमुख यांच्यावर आहेत. त्यावरदेखील ईडीकडून मुख्य सचिव सीताराम कुंटे यांची चौकशी करण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, अनिल देशमुख यांना ईडीने अटक केली असून ते सद्या न्यायालयीन कोठडीत आहेत. अनिल देशमुख यांची ईडी कोठडी 29 नोव्हेंबरला संपणार आहे. यावर ईडीच्या समन्सला उत्तर देताना कुंटे यांना 25 नोव्हेंबर रोजी मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे, त्यामुळे आपण चौकशीला हजर राहू शकत नाही, असे म्हटले.
(हेही वाचा एसटीचे सरकारमध्ये विलिनीकरण कठीण! शरद पवारांचे मत)