गर्भवती महिलांच्या मृत्यूस कारण ठरतोय अ‍ॅनेमिया!

231

शरीरातील लोहाच्या कमतरतेमुळे जगभरात गर्भवती महिलांच्या मृत्यूमागे आता अॅनेमिया कारणीभूत ठरतोय. शहरी भागांतही या मृत्यूंचं प्रमाण आता लक्षणीय ठरतंय. मुंबईसारख्या शहरातही गर्भवती महिलांच्या मृत्यूमध्ये अॅनेमिया हा पहिल्या दोन क्रमांकात दिसतोय. मात्र शहरी असो वा ग्रामीण, महिलांना पुरेसा आहार हा पौंगडावस्थेतूनच कमी पडतोय, असं मत स्त्रीरोगतज्ज्ञ व्यक्त करताहेत.

जगभरात सात दशलक्षाहून अधिक बालके जन्मतःच अॅनेमियाग्रस्त असल्याचे निरीक्षण स्त्रीरोगतज्ज्ञांच्या जागतिक संघटनांकडून नोंदवलं जातंय. गर्भावस्थेतच महिलांना कित्येकदा शरीरात पुरेसं लोहाचं प्रमाण नसल्याचं समजतंय. सातव्या महिन्यात प्रसूतीगृहात नाव नोंदवण्याचं प्रमाणही जास्त आहे, त्यामुळे तपासण्या उशिरा होतात परिणामी अॅनेमियाचं निदान उशिरानं होतं, अशी माहिती ‘फेडरेशन ऑफ ऑब्स्ट्रेटीक गायनोलोजिकल सोसायटी’ (फोक्सी) च्या चेअरमन डॉ कोमल चव्हाण सांगतात.

(हेही वाचा- मुलींच्या पौंगडावस्थेतील लोहाची कमतरता वाढवा, स्त्रीरोगतज्ज्ञांचं आवाहन)

शरीरात रक्ताचं प्रमाण कमी असताना शेवटच्या दोन महिन्यांतील अॅनेमियाच्या उपचारात आव्हानं निर्माण होतात. प्रसूतीदरम्यान अक्षरशः सहा ग्रॅम रक्त उरल्याच्याही केसेसमधील महिलांना जीवनदान देताना डॉक्टरांची कसोटी लागते, असा मुद्दा ‘फोक्सी’चे उपाध्यक्ष डॉ बिपीन पंडित मांडतात. मुळात अॅनेमिया हा गर्भावस्थेतील वयांतील मुलींमध्ये तयार होण्यासाठी खूप वर्षांपासून शरीरात आवश्यक पोषक आहार न गेल्यानं तयार होतोय.

गर्भारपणासाठी नियोजन हवं

गर्भारपणाचं नियोजन करण्यापूर्वी महिलांनी शरीर बाळंतपणासाठी तयार आहे का, याबाबत अगोदर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. जेणेकरुन अॅनेमियाचं वेळेवर निदान झाल्यास तातडीनं उपचार सुरु करता येतील, असे फेडरेशन ऑफ ऑब्स्ट्रेटीक गायनोलोजिकल सोसायटीचे उपाध्यक्ष, डॉ बिपीन पंडित म्हणाले.

आहारातून मिळणारं कॅल्शिअम पुरेसं नाही

वयाची तिशी ओलाडंली की महिलांमध्ये आपसूकच लोहाचं प्रमाण कमी होतं. खजूर, अंजीर, दूध हे घटक रोजच्या आहारामध्ये आवश्यकच आहेत. परंतु शरीराला पुरेसं लोह मिळण्यासाठी लोहाच्या गोळ्याही आवश्यक ठरतात. आता शरीरात थेट रक्तवाहिन्यांतून लोह इंजेक्शनच्या माध्यमातून देता येतंय. महिलांनी शरीराला आवश्यक लोहाचं प्रमाण सांभाळताना गोळ्या आणि आवश्यक आहार घेताना कुचराई करता कामा नये, असं आवाहनही डॉ पंडित करतात.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.