संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये संविधान दिनाच्या निमित्ताने एका कायक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी संबोधित करताना म्हणाले, एकाच कुटुंबातील व्यक्तींनी राजकारणात येऊ नये. भारतीय संविधानाला कुटुंबाच्या राजकीय पक्षांकडून म्हणजेच पार्टी फॉर द फॅमिली यांच्याकडून धोका आहे. काश्मीर टू कन्याकुमारी हे चित्र दिसतंय. यासह ते पुढे असेही म्हणाले की, राजयकीय पक्षातील घराणेशाही लोकशाही मूल्यांच्या विरोधात आहे. ज्यांनी लोकशाहीचे मूल्य गमावलं आहे, ते लोकशाहीचे संरक्षण कसे करू शकतील, असा प्रश्न देखील मोदींनी उपस्थितीत करून अप्रत्यक्षपणे विरोधकांवर जोरदार निशाणा साधला.
Addressing the programme to mark Constitution Day in Central Hall. https://t.co/xmMbNn6zPV
— Narendra Modi (@narendramodi) November 26, 2021
(हेही वाचा – 26/11…मुंबईत दहशतवादाने पहिले पाऊल कधी टाकले?)
गुणवत्तेच्या जोरावर राजकारणात यावे
संविधान दिनाच्या निमित्ताने संसदेत बोलत असताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, भारत एका अशा संकटाकडे वाटचाल करत आहे, जो संविधानाशी समर्पित असलेल्या, राज्यघटनेला वाहिलेल्या लोकांसाठी चिंतेची बाब आहे, लोकशाहीवर विश्वास ठेवणाऱ्यांसाठी ही चिंतेची बाब आहे आणि ती म्हणजे कौटुंबिक पक्ष. आपल्या चांगल्या गुणांच्या आधारे एका परिवारातून अनेक लोकं राजकारणात येत असतील तर ती घराणेशाही नसते, असेही ते म्हणाले. कौटुंबिक राजकीय पक्ष म्हणतो, एका कुटुंबातील अनेक लोक राजकारणात येऊ नये असे मी म्हणत नाही. गुणवत्तेच्या जोरावर राजकारणात यावे. कित्येक पिढ्यांपासून राजकीय पक्ष एक कुटुंब चालवतात, असे नरेंद्र मोदी यांनी म्हणत नाव न घेता काँग्रेसवर टीका केली आहे.
भारत एक ऐसे संकट की तरफ़ बढ़ रहा है, जो संविधान को समर्पित लोगों के लिए चिंता का विषय है, लोकतंत्र के प्रति आस्था रखने वालों के लिए चिंता का विषय है और वह है पारिवारिक पार्टियां: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (सोर्स: संसद टीवी) pic.twitter.com/IuZVK7HNgR
— ANI_HindiNews (@AHindinews) November 26, 2021
संविधान दिवस समारंभात पंतप्रधान मोदी यांनी म्हटले की, भारताला एक संविधानिक लोकशाहीची परंपरा आहे. आजचा दिवस डॉ बाबासाहेब आंबेडकर, डॉ राजेंद्र प्रसाद यांना अभिवादन करण्याचा दिवस आहे. या पवित्र जागेवर काही लोकांनी भारताच्या कुशल भविष्यासाठी विचारविनिमय केले.
Join Our WhatsApp Community