आता एसटीच्या कामगार संघटना कृती समितीसोबत ‘बैठका’!

139

तब्बल १५ दिवस एसटी कर्मचाऱ्यांचा संप झाला. त्यादरम्यान, परिवहन मंत्री अनिल परब यांच्याबरोबर भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी बैठक घेतल्या. बैठकांचे सत्र सुरू राहिले, अखेरीस शरद पवार यांच्या मध्यस्थीने ४१ टक्के पगार वाढीचा निर्णय झाला आणि भाजपने संपाला सक्रिय पाठींबा काढून घेतला तरीही संप सुरूच राहिला. कर्मचाऱ्यांनी स्वंयस्फूर्तीने मागील दोन दिवस संप सुरू ठेवल्याने आता अनिल परब यांनी कर्मचाऱ्यांच्या कृती समितीबरोबर बैठक घेण्याचा निर्णय घेतला.

कृती समिती अद्याप विलिनीकरणावर ठाम

गुरूवारी एसटी कर्मचाऱ्यांसाठी कऱण्यात आलेल्या वेतनवाढीच्या घोषणेनंतर अनिल परब यांनी राज्यातील सर्वच एसटी कर्मचाऱ्यांना कामावर हजर होण्याचा अल्टिमेटम दिला आहे. यानंतर राज्यभरात साधारण ९ हजारांहून अधिक कर्मचारी सेवेत रूजू झाले आहेत. असे असतानाही एसटी कर्मचारी आणि एसटी कामगार कृती समिती अद्याप विलिनीकरणाच्या मुद्द्यावर ठाम आहेत. या पार्श्वभूमीवर आज संध्याकाळी पाच वाजता परिवहन मंत्री अनिल परब यांच्यासोबत बैठक घेणार आहे.

(हेही वाचा – अखेर ‘लालपरी’चे विलिनीकरण लटकले, मात्र कर्मचाऱ्यांना 41 टक्के पगारवाढ)

पुन्हा एकदा परिवहन मंत्र्यांची भेट

राज्यातील एसटी कामगार संघटनेच्या प्रतिनिधींनी अनिल परब यांची बांद्रा येथील शासकीय निवासस्थानी भेट घेऊन वेतन वाढीबद्दलचा प्रश्न त्यांच्या पर्यंत पोहोचवला होता. विलिनीकरणाच्या मुद्द्यावर ठाम असल्याची संघटनांची भूमिका कायम असून आता यावर ते पुन्हा एकदा परिवहन मंत्र्यांची भेट घेणार आहे. विलिनीकरणाचा मुद्दा हा न्यायालयाच्या अखत्यारित आहे. या प्रकरणी नेमलेल्या समितीला १२ आठवड्यांची मुदत देण्यात आली आहे. या समितीचा जो काही निर्णय असणार आहे, त्याला राज्य सरकार मंजुरी देईल, असेही परब यांनी सांगितले आहे. कर्मचाऱ्यांचा संप मिटावा म्हणून राज्य सरकारने कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.