भारत-इस्रायल संबंध बळकट राहावेत, ही आमच्यासाठीही महत्त्वाची बाब – इस्रायल कौन्सुल जनरल

168

२६/११ च्या दहशतवादी हल्ल्याचा तो दिवस खूपच दु:खद आणि धक्कादायक होता. भारत इस्रायल आणि मुंबईसाठी तो सर्वात वाईट दिवस ठरला. आम्ही प्रदीर्घ काळापासून दहशतवादाने त्रस्त आहोत तसेच सर्वप्रकारच्या दहशतवादाशी संघर्षही करीत आहोत. भारत आणि इस्रायल दोन्ही देश परस्परांना सहकार्य करीतच आहेत. दोन्ही देशांचे संबंध बळकट राहावेत, ही बाब आमच्यासाठीही खूप आवश्यक आहे, असे उद््गार इस्रायलचे मुंबईतील कौन्सुल जनरल (महावाणिज्यदूत) कोब्बि शोशानि यांनी शुक्रवारी २६ नोव्हेंबर २०२१ या दिवशी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात बोलताना काढले.

‘ भारताने इस्रायलला राजकीय मान्यता द्यावी’

तेरा वर्षांपूर्वी झालेल्या २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याच्या निमित्ताने त्यांनी मुंबईतील महत्त्वाच्या ठिकाणांना भेट दिली. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी इस्रायलच्या निर्मितीसाठीे राजकीय समर्थन दिले होते. भारताने इस्रायलला राजकीय मान्यता द्यावी, अशी मागणी करणाऱ्या नेत्यांमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर हे एकमेव नेते होते, असे ते म्हणाले. सावरकर यांचे घोषणापत्र आणि त्यांची विधाने माझ्या कार्यालयातही माझ्या टेबलापाशी कायम असतात, असेही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.

(हेही वाचा – 26/11…मुंबईत दहशतवादाने पहिले पाऊल कधी टाकले?)

भारताच्या पाठिंब्याबाबत कायमच समाधानी

आपण भारतात अनेक काळापासून येत असून संस्कृती आणि परंपरा या दोन महत्त्वाच्या घटकांना दोन्ही देशांमध्ये संबंध प्रस्थापित करण्यासाठी आवश्यक असतात. आमच्यामध्ये हे संबंध वर्षानुवर्षे असून संस्कृती आणि परंपरा यामुळे हे शक्य झाले आहे, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. इस्रायलने हम्मासला संपवण्यासाठी हल्ले केले आणि त्यासाठी फेसबुक आणि ऑनलाईनवर मोठे समर्थन भारतातून केले गेले होते, भारताच्या पाठिंब्याबाबत आपण कायमच समाधानी आहोत. ही बाब दोन्ही देशांमधील दृढ संबंध व्यक्त करणारी आहे, असेही ते म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.