सक्तवसुली संचालनालयाने शुक्रवारी औरंगाबादचे शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांच्याशी संबंधित अनेक ठिकाणी छापे टाकले आहेत. अर्जुन खोतकर हे कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रमुख आहेत. भाजपा नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी अर्जुन खोतकर यांच्यावर 100 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप केला होता. त्यामुळे अर्जुन खोतकर आता ईडीच्या रडारवर आले आहेत. शुक्रवारी सकाळी साडे आठ वाजता खोतकरांच्या जालन्यातील निवासस्थानी टाकलेला छापा रात्री 2 वाजेपर्यंत सुरु होता.
शेतक-यांच्या जमिनी बळकावल्या
शुक्रवारी ईडीची अनेक पथकं खोतकरांच्या जालन्यातील भाग्यनगर बंगल्यासह विविध ठिकाणी पोहोचले. 12 जणांचे पथक अजूनही त्यांच्या जालन्यातील घराची चौकशी करत, असल्याचं म्हटलं जातं आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी 2016 ते 2019 दरम्यान जालन्याचे आमदार आणि महाराष्ट्र सरकारमध्ये मंत्री म्हणून काम केलेले खोतकर यांनी 10 हजार शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावल्याचाही आरोप केला होता.
किरीट सोमय्यांनी केलं होतं लक्ष्य
गेल्या काही दिवसांमध्ये महाविकास आघाडीचे काही मंत्री आणि नेत्यांवर ईडीनं छापेमारीची कारवाई केली आहे. त्यामध्ये आता अर्जुन खोतकर यांच्या नावाचादेखील समावेश झाला आहे. शुक्रवारी सकाळी साडे आठ वाजता खोतकरांच्या जालन्यातील निवासस्थानी टाकलेला छापा रात्री 2 वाजेपर्यंत सुरुच होता. दरम्यान, छापा पडला, तेव्हा अर्जुन खोतकर घरीच असल्याचं बोललं जात आहे. काही दिवसांपूर्वीच जालना सहकारी साखर कारखान्याच्या खरेदी-विक्री व्यवहाराशी संबंधित दोन उद्योजकांवर ईडीने छापे टाकले होते. त्यानंतर किरीट सोमय्यांनी अर्जुन खोतकर यांना लक्ष्य केलं होतं.
(हेही वाचा :राज्य सरकारचा मोठा निर्णय, कोरोनाने मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबांना ५० हजारांची आर्थिक मदत)
Join Our WhatsApp Community