‘माझा अनिल देशमुख करण्याचा डाव’

140

गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक हे चांगलेच चर्चेत आहे. दरम्यान, नवाब मलिकांनी पुन्हा एकदा नवा आरोप केला आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना खोट्या केसेसमध्ये अडकवण्यात आले. माझ्याविरोधातही त्याच पद्धतीचे षडयंत्र सुरू आहे. केंद्रीय तपास यंत्रणा खोटी माहिती देवून मला अडकवण्याचा प्रयत्न करत आहेत. अनिल देशमुख यांच्यासह जो खेळ झाला तो माझ्यासह केला जात असल्याचा गंभीर आरोप मलिकांनी केला आहे.

शहांकडे लवकरच तक्रार करणार

अनिल देशमुखांप्रमाणे मलाही अडकवण्यासाठी कटकारस्थान सुरु असून मला अडकवण्याचा प्रयत्न करत आहेत, असा गंभीर आरोप करतानाच या प्रकरणाची मी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे लवकरच तक्रार करणार आहे, असे राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी सांगितले. ते पुढे असेही म्हणाले की, माझ्याविरोधात खोटी तक्रार करण्यात आली आहे. मी त्याचीही माहिती मुंबई पोलीस आयुक्तांना देणार आहे.

(हेही वाचा – भारतातील कोरोना लसींनाही निष्प्रभ ठरवू शकतो ‘हा’ नवा व्हेरियंट?)

‘दुसरे देशमुख करण्याचा डाव’

या प्रकरणासंदर्भात मी शहा यांना पत्रं लिहून तक्रार करणार आहे. मला अडकवण्याचा डाव करणार असाल तर मी घाबरणार नाही. या संपूर्ण प्रकरणावर शहा काय कारवाई करतात हे पाहणार आहे. तसेच माझ्याविरोधात कुठे आणि किती तक्रारी करण्यात आल्या त्याची आरटीआयमधून माहिती घेणार आहे. राज्याच्या मंत्र्यांना फ्रेम करण्याचा हा मोठा डाव आहे. एक अनिल देशमुख झाले, आता मला फ्रेम करून दुसरे देशमुख करण्याचा डाव आहे, असा खऴबळजनक दावा त्यांनी केला आहे.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.