नीती आयोगाकडून नुकताच भारताचा राष्ट्रीय बहुआयामी गरीबी निर्देशांक अहवाल जारी केला आहे. या प्रकाशित केलेल्या अहवालानुसार, मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी आणि देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जाते. मात्र सर्वाधिक लोकसंख्या योग्य पोषणापासून वंचित असणाऱ्या राज्यांमध्ये महाराष्ट्र राज्याचा समावेश असून 36.09 टक्के इतकी लोकसंख्या योग्य पोषणापासून वंचित असल्याचे समोर आले आहे.
कोणत्या राज्याची किती लोकसंख्या कुपोषित
दरम्यान, महाराष्ट्रातील आकडेवारी पेक्षा हा आकडा गुजरातपेक्षा कमी असून गुजरातमध्ये 41.37 टक्के लोकसंख्या योग्य पोषणापासून वंचित आहे. यानतंर पश्चिम बंगालमध्ये 33.62 टक्के, कर्नाटकमध्ये 33.56 टक्के आणि तेलंगणात 31.10 टक्के लोक संख्या योग्य पोषणापासून वंचित आहेत
कुपोषण म्हणजे काय
पुरेसा, योग्य आहार न घेतल्यामुळे जी अशक्तपणाची व आजारपणाची परिस्थिती निर्माण होते त्यास कुपोषण म्हणतात. कुपोषण म्हणजे आजार नव्हे परंतु अयोग्य आहार, उपासमार व जीवनसत्वांचा अभाव यांचा परिणाम मुलांच्या शरीरावर किंवा व्यक्तीवर होतो. एखाद्या घरात 0 ते 59 महिने वयोगटातील कोणतीही व्यक्ती 15 ते 49 वर्षे वयोगटातील महिला किंवा 15 ते 54 वर्षे वयोगटातील पुरुष कुपोषित असल्याचे आढळते.
गरिब राज्यांत आघाडीवरील चार भाजपशासित राज्ये
आयोगाने जाहीर केलेल्या आकडेवारीत सर्वांत गरिब राज्यांत आघाडीवर असलेल्या पाच राज्यांपैकी चार भाजपशासित राज्ये आहेत. गरिब राज्यांच्या यादीत उत्तर प्रदेशचा समावेश आहे. या यादीनुसार, बिहार देशात पहिल्या क्रमांकावर आहे. झारखंड दुसऱ्या, तर उत्तर प्रदेश तिसऱ्या स्थानी आहे. केरळमध्ये सर्वात कमी गरिबी असल्याचं नीती आयोगाचा अहवाल सांगतो. या यादीत महाराष्ट्र 17 व्या स्थानी असून, राज्यातील 14.85 टक्के जनता गरिब असल्याचे समोर आले आहे.
Join Our WhatsApp Community