२१ वर्षाच्या तरुणीवर अत्याचार करून तिची हत्या केल्याप्रकरणी विनोबा भावे नगर पोलिसांनी तिच्या प्रियकरासह दोघांना अटक केली आहे. अटक आरोपी आणि मृत तरुणी हे गोवंडी टाटा नगर परिसरात राहणारे आहेत. विनोबा भावे नगर पोलिसांनी ४८ तासात या गुन्ह्याचा छडा लावून दोन जणांना अटक केली आहे.
असा घडला प्रकार
कुर्ला पश्चिम कोहिनूर सिटी, एचडीआयएल कंपाउंड या ठिकाणी असणाऱ्या रिकाम्या इमारतीपैकी एका इमारतीच्या गच्चीत लिफ्टसाठी तयार करण्यात आलेल्या कॅबिनमध्ये २१ वर्षाच्या तरुणीचा मृतदेह २५ नोव्हेंबर रोजी रात्रीच्या आढळून आला होता. या तरुणीवर लैगिंग अत्याचार करून तिची हत्या करण्यात आल्याचे शवविच्छेदन अहवालातून समोर आल्यामुळे एकच खळबळ उडाली होती. २४ तासानंतर या तरुणीची ओळख पटवण्यात आली होती, सदर तरुणी ही गोवंडी टाटा नगर येथून २३ नोव्हेंबर पासून बेपत्ता असल्याची तक्रार देवनार पोलीस ठाण्यात दाखल होती.
पोलिसांनी या मुलीचे मित्रमैत्रिणी लकडे याबाबत चौकशी सुरू केली असता या तरुणीचा प्रियकर हा गोवंडी परिसरातच राहण्यास असल्याची माहिती मिळाली. दरम्यान तपास पथकाने या तरुणीचा प्रियकराचा शोध घेऊन त्याच्यासह दोघांना ताब्यात घेतले. या दोघांची कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. शनिवारी रात्री उशिरा या दोघांना अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
Join Our WhatsApp Community