…तर सार्वजनिक ठिकाणच्या कर्मचाऱ्यांवर होणार कारवाई!

115

मुंबईत कोरोना प्रतिबंधक लसीकरणाच्या मोहिमेला जानेवारी महिन्यात सुरुवात करण्यात आली आहे. मात्र, कोविडचा लॉकडाऊन शिथिल करताना सार्वजनिक ठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना लसींच्या दोन मात्रा घेणे बंधनकारक केले होते. दोन लसीकरण झालेल्या कर्मचाऱ्यांना प्रवेश दिला जावा, असे स्पष्ट निर्देश होते. त्यामुळे जर दुकाने, मॉल्स, चित्रपटगृहांमध्ये काम करणारे कर्मचारी लसीकरणाच्या दोन्ही मात्रा घेतलेले नसल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी दिले आहेत.

महापालिका, पोलिस प्रशासनाची संयुक्त बैठक

आफ्रिकन देशांमध्ये वाढत असलेल्या कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त आश्विनी भिडे, पी. वेलरासू, सुरेश काकाणी, सर्व सहआयुक्त, उपायुक्त, सहाय्यक आयुक्त यांच्यासह पोलिस प्रशासनाचे सहआयुक्त (कायदा व सुव्यवस्था) विश्वास नांगरे पाटील, इतर पोलिस अधिकारी, छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाचे अधिकारी, महानगरपालिकेच्या सर्व प्रमुख रुग्णालयांचे अधिष्ठाता, उपनगरीय रुग्णालयांचे वैद्यकीय अधीक्षक, कार्यकारी आरोग्य अधिकारी आणि टास्क फोर्सचे सदस्य या सर्वांची संयुक्त बैठक दूरदृश्य प्रणालीद्वारे शनिवारी सायंकाळी आयोजित  केली होती. महानगरपालिका आयुक्त डॉ. चहल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत कोविड विषाणूचा ओमिक्रोन प्रकार आणि त्या पार्श्वभूमीवर घ्यावी लागणारी खबरदारी या दिशेने सविस्तर चर्चा करण्यात आली.

(हेही वाचा ग्राहक दिसला विनामास्क, तर दुकान मालक, मॉल्स व्यवस्थापनाला होणार मजबूत दंड)

लसीच्या दुस-या मात्रा पूर्ण करण्याचे निर्देश

याप्रसंगी बोलतांना चहल यांनी लसीच्या दोन्ही मात्रा घेतलेल्या नागरिकांनाच सार्वजनिक ठिकाणी प्रवेश देण्याबाबत भर दिला पाहिजे, असेही निर्देश दिले आहेत. विविध आस्थापना, दुकाने, मॉल, चित्रपटगृह अशा सार्वजनिक ठिकाणी कार्यरत कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण झाले नसल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, असेही आयुक्तांनी स्पष्टपणे सांगितले आहे. मुंबईमध्ये कोविड लसीची पहिली मात्रा देण्याचे लक्षांक पूर्ण केले, तसे आता दुसरी मात्रा देण्याचे लक्षांक देखील तातडीने पूर्ण करणे आवश्यक आहे, या मुद्द्यावरही डॉ. चहल ह्यांनी भर दिला.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.