विना मास्क विरोधातील कारवाई पुन्हा जोरात

118

कोविडचा आजार नियंत्रणात आल्याचा समज करून घेत अनेक जण मास्क न लावतात निष्काळजीपणे वागत असून अशा लोकांवरील कारवाईतही शिथिलता आलेली आहे. परंतु आफ्रिकन देशांमध्ये वाढलेल्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकादा विना मास्क विरोधातील कारवाई कडक केली जाणार आहे. महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल  यांनी पुन्हा एकदा कारवाई कडक करण्याचे निर्देश सर्व विभागांच्या सहायक आयुक्तांना दिले आहेत. मागील काही महिन्यांमध्ये कोविडच्या रुग्णांची संख्या नियंत्रणात आल्याने तसेच महापालिकेच्या क्लीन अप मार्शलकडून होणाऱ्या कारवाईचे प्रमाण कमी आहे. परंतु कोविड विषाणू संसर्ग पूर्णपणे संपलेला नाही, असे वारंवार बजावूनही बरेचसे नागरिक बेफिकीरपणे वावरत असल्याचे निदर्शनास येत आहे, ही चिंतेची बाब आहे, असे सांगून यापुढे योग्य प्रकारे  मास्क न लावणाऱ्या नागरिकांवर महानगरपालिका आणि पोलिस प्रशासनाने पुन्हा एकदा  कडक कारवाई सुरू करावी, असे निर्देश महापालिका आयुक्तांनी दिले आहेत.

आजही विनामास्क कारवाई सुरू

विना मास्क विरोधी कारवाईची मोहिम हाती घेतल्यापासून आतापासून महापालिकेने नियुक्त केलल्या क्लीन अप मार्शल आणि उपद्रव शोधक पथकाच्या माध्यमातून ३२ लाख  १६ हजार ४२२ लोकांवर कारवाई करण्यात आली आहे. तर पोलिसांच्या माध्यमातून ६ लाख ६८ हजार ३४ विना मास्कच्या नागरिकांवर कारवाई करण्यात आली आहे. तसेच रेल्वेसह एकूण  ३९ लाख ०८ हजार ३४७ विना मास्कच्या लोकांवर कारवाई करून त्यांच्याकडून ७८ कोटी ५५ लाख ७० हजार ६०० रुपयांच्या दंडाची रक्कम वसूल करण्यात आली आहे. मात्र, आजही महापालिकेच्या प्रत्येक विभाग कार्यालयांच्या हद्दीमध्ये सरासरी दोनशे ते अडीचशे लोकांवर कारवाई करण्यात येत आहे.

(हेही वाचा …तर सार्वजनिक ठिकाणच्या कर्मचाऱ्यांवर होणार कारवाई!)

कारवाई काही प्रमाणात थंडावलेली

मागील काही दिवसांमध्ये संपूर्ण मुंबईमध्ये सरासरी पाच हजार लोकांवर कारवाई करण्यात येत आहे. जे प्रमाणे कोविड काळामध्ये वाढलेले होते. ते प्रमाण आता पुन्हा वाढवण्यात येणार आहे. क्लीन अप मार्शलकडून दंड आकारताना होणारे गैरवर्तन आणि अश्लाघ्य भाषा यामुळे काही भागांमधील क्लीन अप मार्शल संस्थांचा आढावा घेऊन अशा संस्थांवर कारवाई करण्याची पावले महापालिकेने उचलली होती. ज्यामुळे ही कारवाई काही प्रमाणात थंड पडली होती. परंतु आता महापालिका पुन्हा एकदा मास्क लावण्यासाठी लोकांवर दंडाची कारवाई करणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.