आफ्रिकेअगोदरच जगभरात पसरलाय  कोरोनाचा नवा विषाणू! आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांची भीती

128

दक्षिण आफ्रिकेत कोरोनाचा नवा भयंकर विषाणू सापडल्याचे उघडकीस आल्यानंतर भारताने आंतरराष्ट्रीय तसेच अंतर्गत प्रवासाचे नियम कडक केले आहेत. मात्र हा विषाणू केवळ आफ्रिकेत दिसून आला नसून, अगोदरपासूनच जगभरात पसरल्याची भीती आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. या विषाणूसमोर लसीकरणाचाही निभाव लागणार नाही, अशीही भीती वैद्यकीय क्षेत्रातून व्यक्त होत आहे.

विषाणू डेल्टापेक्षाही भयानक

‘बी १.१.५२९’ हा नवा विषाणू आफ्रिकेत आढळल्याचे शुक्रवारी जाहीर करण्यात आले. हा विषाणू डेल्टापेक्षाही भयानक असून, याबाबत जागतिक आरोग्य संघटनेनेही जगभरातील सर्वच देशांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. २४ नोव्हेंबर रोजी आफ्रिकेत हा कोरोनाचा विषाणू आढळून आला. सर्व तपासानंतर जागतिक आरोग्य संघटनेने या ‘बी १.१.५२९’ नव्या विषाणूला ‘ओमिक्रोन’ हे नाव  दिले आहे.

(हेही वाचा धक्कादायक! मुंबईत ९४ हजार फ्रंटलाईन वर्कर्सचे लसीकरण बाकी)

दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या ६०० प्रवाशांची कोरोना तपासणी 

बहुतांश देशांनी आफ्रिकेतील विमानप्रवासही सुरक्षिततेच्या कारणास्तव बंद केला आहे. मात्र दुस-याच दिवशी शनिवारी युकेतही ‘ओमिक्रोन’चा विषाणूचे दोन कोरोना रुग्ण आढळल्याचे जाहीर करण्यात आले. युकेतल्या रुग्णांनी दक्षिण आफ्रिकेत प्रवास केलेला नव्हता. बेल्जियममध्येही हा विषाणू आढल्याचे स्पष्ट झाले आहे. बेल्जियममध्ये ‘बी.१.१.५२९’ विषाणू आढळेल्या कोरोना रुग्णानेही आफ्रिकेत प्रवास केला नव्हता. शनिवारी रात्री नेदरलॅण्डने ६१ कोरोना रुग्ण ‘बी१.१.५२९’ विषाणूने बाधित असल्याचे जाहीर केले. या रुग्णांनी दक्षिण आफ्रिकेतून नेदरलॅण्डला प्रवास केला होता. शुक्रवारी दक्षिण आफ्रिकेतून परतलेल्या दोन विमानांमधील तब्बल ६०० प्रवाशांची कोरोना तपासणी करण्यात आली. त्यापैकी ६१ रुग्णांची कोरोनाची चाचणी सकारात्मक आली. मात्र या रुग्णांमध्ये नवा विषाणू आढळला का, याबाबतची माहिती देण्यात आलेली नाही.

या देशात सापडला विषाणू

आफ्रिका, बोट्सवाना, बेल्जियम, हाँगकोंग, इस्त्रायलमध्ये बी.१.१.५२८ चे विषाणू सापडले.

काय आहे तज्ज्ञांची भीती?

युरोपात ‘ओमिक्रोन’ विषाणू आढळलेल्या रुग्णांने दक्षिण आफ्रिकेत प्रवास केला नव्हता. बेल्जियममध्ये आढळलेल्या रुग्णानेही दक्षिण आफ्रिकेत प्रवास केला नव्हता. बेल्जियममधील ‘ओमिक्रोन’ विषाणू आढळलेल्या रुग्णाने इजिप्त आणि टर्की या दोन देशांमध्ये प्रवास केला होता. त्यामुळे ‘ओमिक्रोन’ हा विषाणू अगोदरपासूनच जगभरात पोहोचल्याची भीती वॉशिंग्टन येथील साथरोगतज्ज्ञ व आरोग्यविषयक अर्थतज्ज्ञ एरिक फेगी-डिंग यांनी दिली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.